बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना इंडस्ट्रीमध्ये 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आता आम्ही तुम्हाला बिग बींच्या सी ग्रेड चित्रपटाबद्दल सांगणार आहोत.
ज्याने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच बिग बींच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. चित्रपटाने बिग बींचे नाकही कापले. तर या चित्रपटानंतर त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं.
अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाचे नाव 'बूम' आहे. जो 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये बिग बींसह जैकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, पद्मा लक्ष्मी, मधु आणि जीनत अमान होते.
याच चित्रपटातून कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे निर्माता आयशा श्रॉफ होती.
या चित्रपटात प्रचंड बोल्ड सीन होते. हा चित्रपट शेवटच्या क्षणी कतरिना कैफला ऑफर करण्यात आला होता. या चित्रपटात मेघना रेड्डी मुख्य नायिका होती.
चित्रपटातील बोल्ड सीन्सचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर या चित्रपटातील ही सीन्स पुन्हा बदलण्यात आले होते.
'बूम' चित्रपटाला प्रदर्शित होताच ट्रोल केलं. या चित्रपटासंदर्भात नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या. हा चित्रपट फ्लॉप ठरला. ज्यामध्ये आयेशा श्रॉफ आणि जॅकी श्रॉफला खूप त्रास सहन करावा लागला होता.
फ्लॉप झाल्यानंतर बँकेचे कर्ज फेडण्यासाठी निर्मात्याने घर आणि फर्निचर दोन्ही विकले. यांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर झाला. IMDbवर या चित्रपटाला 2.1 रेटिंग मिळाली.