ताच बॉक्स ऑफिसवर तब्बल 286 आठवडे राज्य केलं. पण तुम्हाला माहिती आहे का 'शोले'...
बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर अनेक आठवडे राज्य केलं.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याला प्रदर्शित होऊन 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही या चित्रपटाची प्रचंड चर्चा होते.
बॉलिवूडमधील 'शोले' चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा असते. या चित्रपटातील गाणी आणि संवादाचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची जय-वीरुची जोडी ही खूपच लोकप्रिय ठरली. हा चित्रपट सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.
दरम्यान, बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार 'शोले' चित्रपटाच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.
'शोले' चित्रपट 1975 मध्ये 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाची निर्मिती जी.पी. सिप्पी यांनी केली होती.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'शोले' चित्रपटाचे बजेट हे 3 कोटी रुपये इतके होते. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जगभरात 50 कोटींची कमाई केली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, 'शोले' हा चित्रपट तब्बल 5 वर्षे थिएटरमध्ये सुरु होता. जर तुम्हाला हा चित्रपट बघायचा असेल तर तुम्ही तो अमेझॉन प्राइमवर पाहू शकता.