Amitabh Bachchan Blockbuster Movies: 1983 मध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कब्जा केला होता. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे आजही लोकांना वेड आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या 3 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला होता.
अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे आजही लोकांना वेड आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या 3 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला होता.
अमिताभ बच्चन यांचा 'कुली' हा चित्रपट 1983 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी इकबाल असलम खान खान या रेल्वे पोर्टरची भूमिका साकारली होती.
प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. त्यामुळेच हा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटात अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते.
अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट 1983 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह रजनीकांत, हेमा मालिनी, रीना रॉय यांच्या मुख्य भूमिका होत्या.
याचवेळी या चित्रपटात धर्मेंद्र यांनी एक कॅमिओ केला होता. हा चित्रपट तमिळ चित्रपट 'सत्तम ओरु इरुत्तराई'चा रिमेक होता. या चित्रपटावर देखील प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला होता.
1983 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा अमिताभ बच्चन यांचा 'नास्तिक' हा दहावा चित्रपट होता. अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाने देखील प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून दिली होती.
हा चित्रपट विनोद दोशी निर्मित आणि प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित एक अॅक्शन ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्याह अनेक कलाकार दिसले होते.