एका चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांनी कट म्हटल्यावरही सुरुच ठेवली होती मारहाण. या घटनेनंतर दोघांमध्ये झाला दुरावा. पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र, एका कलाकारासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मात्र, त्यांच्या कारकिर्दीत एक चित्रपट असा होता ज्यामध्ये त्यांचे सहकलाकाराशी जोरदार भांडण झालं. त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला. ते परत कधीच एकत्र दिसले नाहीत.
परंतु, ज्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि त्या कलाकाराचे भांडण झाले. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर ठरला.
आम्ही अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल बोलत आहोत. या दोघांचे भांडण झाले तो चित्रपट 'काला पत्थर' होता.
शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन हे चांगले मित्र होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. परंतु दोघांच्या नात्यामध्ये अनेकदा चढ-उतार आले.
एकदा शत्रुघ्न सिन्हा सेटवर आले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की फाईटच्या सीनमध्ये काही बदल केला आहे. ज्यामध्ये अमिताभ हे फक्त तुम्हाला मारतील.
त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की हे तर आधी ठरले नव्हते. जर शशि कपूर त्यांना रोखणार नाहीत तर माझे पात्र मरेल असं ते म्हणाले. अमिताभ बच्चन शूटिंगमध्ये यश चोप्रा कट म्हणाले तरी ते शत्रुघ्न सिन्हा यांना मारतच राहायचे.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर परत ते दोघे कधीही एका चित्रपटात दिसले नाहीत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3 कोटीची कमाई केली होती.