बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीज त्यांचा अभिनय, फिटनेस आणि सुंदरता यासाठी ओळखले जातात. डायबेटिज ही जगातील एक वाढती समस्या असून अनेक सेलिब्रिटीज सुद्धा याचे रुग्ण आहेत. त्यामुळे या सेलिब्रिटीजना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. केवळ बॉलिवूडमधील जेष्ठ कलाकारच नाही तर काही तरुण कलाकारांना सुद्धा डायबेटिज हा आजार झालेला आहे.
बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन हे सध्या 82 वर्षांचे असून ते अजूनही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. अमिताभ यांना टाइप 2 डायबेटिज आहे.
अभिनेत्री सोनम कपूर हिला वयाच्या 17 व्या वर्षी डायबेटिज डिटेक्ट झाला. अमिताभ प्रमाणे सोनमला सुद्धा टाइप 2 डायबेटिज आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. सुंदरता आणि अभिनयात भल्याभल्यांना मात देणारी समांथा हिला 2013 मध्ये डायबेटिज डिटेक्ट झाला होता.
बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री रेखा ही तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जाते. मात्र रेखा सुद्धा डायबेटीजची रुग्ण असून ती आहार, व्यायाम, योगा द्वारे स्वतःला फिट ठेवते.
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपर खलनायक अशी ओळख असणारा राणा दग्गुबाती हा त्याच्या फिटनेससाठी सुद्धा फार प्रसिद्ध आहे. मात्र राणा सुद्धा टाइप 1 डायबेटिजचा रुग्ण आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपड़ाचा पती गायक निक जोनास हा सुद्धा डायबेटिज या आजाराशी झुंज देत आहे. डायबेटिज असल्यामुळे निक जोनास त्याच्या आहाराकडे विशेष लक्ष देतो.
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेता सुपरस्टार कमल हासन सुद्धा टाइप 1 डायबेटिजचा रुग्ण आहे. त्यांनी याबाबत स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते.
फवाद खान हा मूळ पाकिस्तानी अभिनेता असून त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. फवाद हा टाइप 1 डायबेटिजचा रुग्ण आहे.