PHOTOS

PHOTO: आनंद महिंद्रांनी पाळला दिलेला शब्द; शितल देवीला स्कॉर्पियो गिफ्ट!

Anand Mahindra Gifts To Paralympian Sheetal Devi: महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा देशातील गुणवंतांचे कौतुक करत असतात. 

Advertisement
1/11
आनंद महिंद्रांनी पाळला दिलेला शब्द; शितल देवीला स्कॉर्पियो गिफ्ट!
आनंद महिंद्रांनी पाळला दिलेला शब्द; शितल देवीला स्कॉर्पियो गिफ्ट!

आनंद महिंद्रांनी देशातील गुणवंतांचे कौतुक आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करत असतात. यातील काहींना ते गिफ्टही देत असल्याचे आपण पाहिले असेल. 

2/11
खेळाडुंना प्रोत्साहन
 खेळाडुंना प्रोत्साहन

महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा देशातील गुणवंतांचे कौतुक करत असतात. खेळाडुंना प्रोत्साहन, बक्षिस देण्यासाठी पुढाकार घेतात.

3/11
कास्य पदक
कास्य पदक

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये पॅरा ऑलिम्पियन शितल देवीने मिक्स टीम कम्पाऊंड इव्हेंटमध्ये कास्य पदक जिंकले होते. 

4/11
2023 मध्ये घोषणा
2023 मध्ये घोषणा

याआधी 2023 मध्ये शीतल देवीला स्कॉर्पियो गिफ्ट करण्याची घोषणा आनंद महिंद्रा यांनी केली होती. आता त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. 

5/11
कस्टमाइज कार
कस्टमाइज कार

शितल आपल्या आवडीची कोणतीही कार निवडू शकते, असे ते म्हणाले होते. ही कार ती चालवू शकेल अशी कस्टमाइज केली जाईल असेही ते म्हणाले होते. 

6/11
तेव्हा शितल 16 वर्षांची
तेव्हा शितल 16 वर्षांची

आनंद महिंद्रांनी ही घोषणा केली तेव्हा शितल 16 वर्षांची होती. आपण 18 वर्षांचे झाल्यावर हे गिफ्ट घेऊ असे शितलने म्हटले होते. 

7/11
दिलेल्या शब्दाची आठवण
दिलेल्या शब्दाची आठवण

गेल्यावर्षी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यावर आनंद महिंद्रा यांनी शितलला दिलेल्या शब्दाची आठवण करुन दिली. मी दिलेला शब्द पूर्ण करण्याची वाट पाहतोय, असे त्यांनी म्हटले होते. 

8/11
शितल 18 वर्षांची
 शितल 18 वर्षांची

अखेर शितल 18 वर्षांची झाली आणि आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.

9/11
स्कॉर्पियो एन कार गिफ्ट
 स्कॉर्पियो एन कार गिफ्ट

आनंद महिंद्रा यांनी शितलला स्कॉर्पियो एन कार गिफ्ट केली. याचे फोटो शितलने सोशल मीडियावर शेअर केले. 

10/11
एक तीर आनंद महिंद्रा यांना गिफ्ट
एक तीर आनंद महिंद्रा यांना गिफ्ट

अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या शितलने आठणवण म्हणून एक तीर आनंद महिंद्रा यांना गिफ्ट केला होता.

11/11
एन कारसह कटराला ट्रीपला
एन कारसह कटराला ट्रीपला

मी माझ्या नवीन स्कॉर्पिओ एन कारसह कटरा येथे पहिल्या ट्रीपला जातेय, असे शितलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 





Read More