Anant Ambani Engagment : अंबानींच्या धाकट्या लेकाच्या साखरपुड्यात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, अनंत अंबानी याच्या शेरवानीवर, त्याला कारणही तसंच होतं, त्याच्या शेरवानीवर करोडो किमतीचा एक ब्रोच लावला होता
‘कार्टियर पँथर ब्रोच’ हा अतिशय महागडा ब्रँड आहे. सोन्यापासून किंवा प्लॅटिनम धातूपासून हा ब्रोच तयार केला जातो. यातील पँथरचे डोळे जे सर्वात आकर्षित आहेत, ते पाचूपासून बनवले जातात.
जॅक कार्टीयर यांनी 1914 मध्ये पँथर ब्रोच लॉन्च केला होता.
या महागड्या ब्रँडेड ब्रोच ची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 1 कोटी 13 लाख 51 हजार पासून ते 1 कोटी 32 लाख 26 हजार 85 पर्यंत या ब्रोचची किंमत असते.
अनंत अंबानीने लावलेला हा ब्रोच कस्टमाइझ करून घेतला होता. शेवटी ''सब पैसा बोलता है '' असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.