Radhika Merchant NMACC Event Black Sari: अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या लूकने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनंत अंबानींची होणारी पत्नी राधिका ही नुकतीच मुंबईमधील एनएमएसीसीच्या कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. यावेळी तिने नेसलेली ब्लॅक साडी ही फारच खास होती. जाणून घेऊयात राधिकाच्या या लूकबद्दल आणि साडीच्या किंमतीसंदर्भात...
राधिका मर्चेंट लवकरच अंबानी कुटुंबाची सून होणार आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड लोकप्रिय आहे. राधिका लवकरच मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानींबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. (सर्व फोटो - सोशल मीडियावरुन साभार)
राधिका मर्चंट ही सोशल मीडियावर तिच्या लूक्स, स्टाइल स्टेटमेंटमुळे कायमच चर्चेत असते. अशीच चर्चा सध्या तिच्या नुकत्याच पहायला मिळालेल्या लूकची आहे.
राधिका मर्चंटचा फॅशन सेन्स तिच्या सासू निता अंबानींसारखाच छान आहे. याचीच प्रचिती निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या (NMACC) कार्यक्रमामध्ये आली. राधिका मर्चंटच्या फॅशनने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
एनएमएसीसीच्या कार्यक्रमात मुकेश अंबानी, निता अंबानींसहीत संपूर्ण अंबानी कुटुंब सहभागी झालं होतं. यामध्ये अंबानींची होणारी सून राधिकाही होती.
दोन दिवस चालेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राधिका मर्चंट ही ब्लॅक अॅण्ड व्हाइट रंगाच्या इंडो-वेर्स्टन साडीमध्ये दिसून आली.
राधिकाच्या ब्लॅक साडीमध्ये पांढऱ्या रंगाच्या धाग्यांची फ्लोरल एम्बॉडरी करण्यात आलेली. या साडीबरोबर राधिकाने मॅचिंग स्वीटहार्ट नेकलाइन ब्लाउज परिधान केला होता. या ब्लाउजचे स्लीव बलून स्टाइलचे होते.
या साडीला शोभून दिलेस अशी राधिकाची ज्वेलरी होती. तिने डायमंड आणि रुबीचा नेकलेस, मॅचिंग रिंग, डायमंड इयररिंग्स आणि ब्रेसलेट घातलं होतं. आपल्या या सुंदर लुकसाठी राधिकाने गडद लाल रंगाची लिपस्टिक, आय मेकअप केला होता.
मात्र सर्वाधिक चर्चा ही राधिकाच्या सुंदर साडीचीच होती. आता या साडीची नेमकी किती होती याबद्दलची महिती समोर आली आहे.
राधिकाची ही साडी शाहबा-दुर्झी या ब्रॅण्डची आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या साडीची किंमत 5 लाख 85 लाख रुपये इतकी आहे.