PHOTOS

भारतीयांच्या वार्षिक पगारापेक्षाही जास्त आहे Anant Ambani ची एका दिवसाची Salary; त्यांचं Yearly पॅकेज..

Anant Ambani Salary Pakage: अनंत अंबानींना कंपनीमध्ये नुकतेच प्रमोशन मिळालं असून त्यांनी एका खास पोस्टवर नियुक्ती झाली आहे. या प्रमोशनबरोबरच अनंत अंबानींच्या पगारातही मोठी वाढ झाली आहे. त्यांचा पगार किती आहे हे पाहूयात...

Advertisement
1/8

रिलायन्स इंडस्ट्रीजचे नवे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांना दरवर्षी किती पगार दिला जाणार यासंदर्भातील तपशील समोर आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पगारासोबतच अनंत अंबानींना कंपनीच्या नफ्यात कमिशन आणि इतर अनेक सुविधाही मिळणार आहेत.

2/8

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 25 जून रोजी अनंत अंबानी यांची कंपनीच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती केली. 1 मे पासूनचा कार्यकाळ गृहित धरुन पुढील पाच वर्षांसाठी अनंत यांची कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 2023 पासून ते कंपनीत गैर-कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. (फोटो- रॉयटर्स)

 

3/8

वाढत्या वयानुसार, मुकेश अंबानी यांनी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या मालकीच्या कंपन्यांमधील जबाबदारी पुढल्या पिढीकडे सोपवण्याच्या योजनेवर काम सुरु केलं आहे. (Pic Courtesy: Yogen Shah)

 

4/8

28 डिसेंबर 2023 रोजी, मुकेश अंबानींनी वडील धीरूभाई यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कंपनीच्या भविष्याबद्दल बोलताना, "रिलायन्सचे भविष्य आकाश, ईशा, अनंत आणि त्यांच्या पिढीच्या हाती आहे. माझ्या पिढीतील लोकांपेक्षा ते आयुष्यात अधिक गोष्टी साध्य करतील आणि रिलायन्सला अधिक यश मिळवून देतील यात मला शंका नाही," असा विश्वास व्यक्त केला होता.

 

5/8

ऑगस्ट 2022 मध्ये अनंत यांच्याकडे कंपनीच्या एनर्जी व्हर्टिकलची म्हणजेच ऊर्जासंदर्भातील विभागाची कमान सोपवण्यात आली. याशिवाय, अनंत मार्च 2020 पासून जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड, मे 2022 पासून रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड आणि जून 2021 पासून रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड तसेच रिलायन्स न्यू सोलर एनर्जी लिमिटेडचे ​​बोर्ड सदस्य आहेत. 

 

6/8

अनंत अंबानी सप्टेंबर 2022 पासून रिलायन्सची सेवाभावी शाखा असलेल्या, रिलायन्स फाउंडेशनच्या बोर्डावर देखील सदस्य आहेत. या माध्यमातून कंपनी समाजसेवेसंदर्भातील कामं करते. (Pic Courtesy: Yogen Shah)

 

7/8

नवे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांना दरवर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून 10 ते 20 कोटी रुपये पगार मिळणार असल्याचं पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. म्हणजेच सरळ आकडेमोड केली तर वर्षाला 10 कोटी रुपये पगार मिळाला तर अनंत अंबानींचा दिवसाचा पगार हा, 2 लाख 73 हजार 972 रुपये इतका असेल.

 

8/8

तर 20 कोटी रुपये वार्षिक पगार अनंत अंबानींना देण्यात आला तर त्यांचा दिवसाचा पगार 5 लाख 47 हजार 945 रुपये इतका असेल. म्हणजेच नव्याने नोकरीला लागलेल्या कोणत्याही सर्वसामान्य भारतीयाच्या वार्षिक पगारा इतका पगार अनंत अंबानींना एका दिवसासाठी मिळेल, असं आपल्याला म्हणता येईल.





Read More