Anant Ambani Radhika Merchant Wedding: अंबानी कुटुंबाकडून मुंबईतील अँटिलियामध्ये अनंत- राधिका यांच्या हळदी समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. मात्र, या हळदीमध्ये सर्वात सुंदर कोण दिसलं हे आपण जाणून घेणार आहोत.
अनंत-राधिका यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून ते 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच अँटिलियामध्ये अनंत-राधिकाचा हळदी कार्यक्रम पार पडला. यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
सारा अली खान, जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर आणि अनन्या पांडे या सतत हटके फॅशन आणि लुकमुळे चर्चेत असतात. अनंत-राधिकाच्या हळदीमध्ये कोणी काय परिधान केले. चला तर मग जाणून घेऊया
अनंत राधिकाच्या हळदीमध्ये सारा अली खानने हळदीसाठी मल्टीकलर लेहेंगा परिधान केला होता. पॅनेल केलेला ब्लाउज, स्कर्ट आणि बॅकलेस चोली आणि खांद्यावर दुपट्टा बांधला होता. पारंपारिक लेहेंग्यासह भरतकाम केलेला बटवा, नेकलेस, कडा आणि अंगठ्यांमुळे ती अधिकच सुंदर दिसत होती.
जान्हवी कपूरने अनंत-राधिकाच्या हळदीसाठी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. मोत्याची सजावट आणि बॉर्डरवर टॅसेल्स असलेल्या साडीमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. मोकळे सोडलेले केस, कानातले डूल आणि अंगठ्यांमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदी समारंभात अनन्या पांडेने अनारकली सूट परिधान केला होता. तिने कुर्त्याला मॅचिंग दुपट्टा आणि पायजमा घातला होता. सोन्याच्या बांगड्या, रिंग्ज, मांग टिक्का लावला होता.
मानुषी छिल्लरने या सोहळ्यासाठी लेहेंगा घातला होता. त्याचबरोबर तिने बटवा, नेकलेस, अंगठ्या आणि कानातले घातले होते. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.