Entertainment : क्रिकेटर असलेला हा या फोटोमधील चिमुकला आज प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. अनेक मुलींना डेट केल्यानंतर त्याने 3 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी घाईघाई लग्न केलं. कारण ही अभिनेत्री लग्नापूर्वी आई होणार होती.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू वडील आणि त्यामुळे रक्तात क्रिकेट लहानपणापासूनच भिन्नभिन्नल होतं. भारतीय अंडर 19 क्रिकेट संघातून या अभिनेत्याने आपली कामगिरी दाखवली.
मात्र म्हणतात ना नशिबात काय वेगळंच लिहून ठेवलं होतं. क्रिकेटर असलेला हा चिमुकला अभिनेत्या बनला. आम्ही बोलत आहोत अंगद बेदीबद्दल.
वयाच्या 16 व्या वर्षी त्याने रणजी ट्रॉफीमधून भारतीय संघात दमदार खेळी केली होती. पण क्रिकेटला अलविदा करत त्याने बॉलिवूडचा रस्ता धरला.
2004 साली 'काया तरन' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. बॉलिवूडच्या मैदानातही त्याने दमदार अभिनयाने सर्वांचं मनं जिंकलं.
अंगदने 'फालतू', 'उंगली', 'पिंक', 'डियर जिंदगी', 'टायगर जिंदा है', 'सूरमा' आणि 'घूमर' या चित्रपटातील अभिनयाने सर्वांना चकित केलं.
अंगदबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे की, तो लेफ्ट असो या राइट दोन्ही हाताने एकसारख काम करु शकतो. अशी खासयित असलेला व्यक्ती संपूर्ण जगात 1 टक्के असतात.
अंगदने मॉडलिंग दुनियेतही आपलं नशिब आजमावलं. तिथेही त्याने खूप नाव कमावलं.
अंगदला स्वयंपाकाची आवड असून तो मोकळ्या वेळेत वेगवेगळे पदार्थ बनवत असतो.
त्याचा वैयक्तित आयुष्यामुळेही तो कायम चर्चेत राहिला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, लग्नापूर्वी त्याने 75 मुलींना डेट केलं होतं.
एवढंच नाही तर त्या मुली कायम त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. काही मुली तर 10 वर्षे मोठ्या होत्या. त्याने बालपणीची मैत्रीण आणि त्यापेक्षा तीन वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न केलं.
लग्नापूर्वी बायको अभिनेत्री नेहा धुपिया प्रेग्नेंट असल्याने त्यांनी 2018 मध्ये घाईने लग्न केलं. या दोघांना आज एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
अभिनेता अंगद बेदीने नुकताच दुबई झालेल्या ओपन इंटरनॅशनल मास्टर्स 2023 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटाकवलंय. हे पदक त्यांने आपल्या वडिलांना समर्पित केलंय.