Animal Movie Intimate Scenes: हे सीन करायला सोयीचे आहे की नाही हे दिग्दर्शकाने माझ्यावर सोडले. ही दृश्ये सौंदर्याच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट बनवायची आहेत, असेही वांगा म्हणाल्याचे तिने सांगितले.
Triptii Dimri Viral Bedroom Scene: अॅनिमल चित्रपटातील तृप्ती डिमरीच्या व्यक्तिरेखेची खूप चर्चा होत आहे. या चित्रपटानंतर तृप्ती डिमरी नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली. तृप्तीच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
तृप्तीने या चित्रपटातील तिच्या इंटीमेट सीन्सबद्दल खुलेपणाने चर्चा केली आहे. इंटिमेट सीनचे शूटींग करतावेळी मला असहाय्य वाटणार नाही याची विशेष काळजी निर्मात्यांनी घेतल्याचे तृप्ती सांगते.
चित्रपटाचा नायक रणबीर कपूर हे दृश्य करताना तृप्तीला अस्वस्थ वाटणार याची काळजी घेत असे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनीही हे लक्षात ठेवल्याचे ती सांगते.
रणबीरसोबतच्या इंटिमेट सीन्सबाबत दिग्दर्शकाशी चर्चा केली होती का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर तिने खुलेपणाने उत्तर दिले. चित्रपट साइन करण्याआधीच दिग्दर्शक वंगा यांनी मला याबाबत माहिती दिली होती, असे तिने सांगितले.
हे सीन करायला सोयीचे आहे की नाही हे दिग्दर्शकाने माझ्यावर सोडले. ही दृश्ये सौंदर्याच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट बनवायची आहेत, असेही वांगा म्हणाल्याचे तिने सांगितले.
अॅनिमलमधील तृप्ती डिमरीच्या पात्राचे नाव झोया आहे. झोयाचे पात्र सुंदर आणि धक्कादायक दिसावे अशी वंगा यांची इच्छा होती.
हा सीन खूप महत्त्वाचा असल्याचे मला जाणवले. अशी दृश्ये चित्रित करताना सेटवरील आजुबाजूच्या वातावरणाचाही फरक पडतो.
सेटवर 5 पेक्षा जास्त लोक नसावेत याची काळजीही दिग्दर्शकाने घेतली. सीनसाठी आवश्यक असलेले दिग्दर्शक, डीओपी आणि कलाकारांव्यतिरिक्त कोणालाही सेटजवळ येण्याची परवानगी नव्हती.
सर्व मॉनिटर बंद ठेवण्यात आले होते. मला काही अडचण नसावी याची काळजी संदीप सरांनी घेतली. तसेच रणबीरदेखील दर 5 मिनिटांनी माझी चौकशी करत होता. मी अस्वस्थ होणार नाही,याची काळजी त्याने घेतली.
'अॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत सातत्याने रेकॉर्ड तोडत आहे. येत्या दोन आठवड्यांत हा चित्रपट 900 कोटींचा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत.
चित्रपटाची कमाई सुरुच असून दुसरीकडे त्यावर टीकाही होत आहे. तृप्तीच्या पात्राची इंटरनेटवर खूप चर्चा होत आहे. याआधी 2022 मध्ये आलेल्या तिच्या 'काला' चित्रपटातील अभिनयाचेही कौतुक झाले होते. याशिवाय तृप्तीने बुलबुल आणि लैला मजनू या चित्रपटांमध्येही काम केले आहे.