स्टार्टअप कंपन्या 'इकोसिस्टम'मध्ये नवीन व्यवसाय वाढण्यास मदत करतात. आर्थक वर्ष 2024 मध्ये 28 भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी जोरदार कमाई केली आहे. जाणून घेऊया यांच्या मालकांचे वार्षिक उत्पन्न.
Startup companies: आजकाल भारतात स्टार्टअप कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढत्या स्टार्टअप कंपन्यांचा देशाच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होतो. स्टार्टअप कंपन्यांचं रोजगार वाढवण्यात मोलाचं योगदान आहे. वित्तीय वर्ष 2024 मध्ये 28 भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी भरपूर कमाई केली. या 28 कंपन्यांच्या 51 संस्थापकांनी एकूण 283.5 कोटींची रक्कम वेतन म्हणून घेतल्याचं सांगितलं जातं.
आहे ना आश्चर्यचकित करणारी रक्कम, पण या संस्थापकांचं सरासरी वेतन वित्तीय वर्ष 2024 मध्ये कमी झालं आहे. अलिकडील एका रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 2023 मधील 7.6 कोटी रुपयांच्या तुलनेत ते 26.9 टक्क्यांनी घसरून 5.55 कोटी रुपये झाले आहे.
या स्टार्टअप्समध्ये मध्ये स्टॉक ब्रोकींग कंपन्यांपासून तर ग्राहक गुड्स पर्यंत कंपन्यांचा समावेश होतो. या स्टार्टअप कंपन्यांमध्ये 'फर्स्टक्राय'चे (Firstcry) संस्थापक 'सुपम माहेश्वरी' यांनी वर्ष 2024 मध्ये सर्वात जास्त 103.8 कोटीची रक्कम वेतन म्हणून अर्जित केली आहे. माहेश्वरी यांनी गेल्या वर्षी सुद्धा सर्वात अधिक 200.7 कोटीची कमाई केली असून यात 50 टक्क्यांची घसरण झालेली आहे. या संस्थेची 2024 ची आवक 6,480 कोटी आहे. या दरम्यान असं सांगितलं जात आहे की या कंपनीला 321.5 कोटींचा तोटा झाला आहे.
झिरोधाचे संस्थापक निखिल आणि नितिन कामथ या यादीत वित्तीय वर्ष 2024 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. या दोन्ही भावांनी प्रत्येकी वर्ष 2023 मध्ये 48 कोटी रुपये वेतन घेतले होते, पण वित्तीय वर्ष 2024 मध्ये प्रत्येकाने 33.8 कोटी रुपये वार्षिक वेतन घेतले आहे. वित्तीय वर्ष 2024 मध्ये झिरोधाचा ऑपरेशनल रेव्हन्यू 9,372.1 कोटी रुपये होता आणि कंपनीने या कालावधीत 5,496.3 कोटी रुपये नफा कमावला.
कॅपिलरी टेक्नोलॉजीचे संस्थापक 'अनीश रेड्डी' या यादीत तिसऱ्या स्थानावर होते. त्यांनी वित्तीय वर्ष 2024 मध्ये 13.3 कोटी रुपये वेतन घेतले आहे, जे वित्तीय वर्ष 2023 च्या 84 लाख रुपये वेतनापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. हॉटेल सॉफ्टवेअर कंपनी रेटगेनचे संस्थापक 'भानू चोप्रा' यांना वित्तीय वर्ष 2024 मध्ये 5.8 कोटी रुपये वेतन मिळाले आहे, जे आर्थिक वर्ष 2023 मध्ये 6.1 कोटी रुपये होते. रेटगेनच्या ऑपरेशनल रेव्हेन्यूत 69% वाढ झाली, तसेच कंपनीने 146.3 कोटी रुपये नफा कमावला.
पेटीएमचे एमडी आणि सीईओ 'विजय शेखर शर्मा' या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. त्यांनी वित्तीय वर्ष 2024 मध्ये 4.4 कोटी रुपये वार्षिक वेतन घेतले, जे आर्थिक वर्ष 2023 मध्ये घेतलेल्या 4 कोटी रुपये वेतनापेक्षा 10% जास्त आहे.
मामाअर्थचे सीईओ 'वरुण अलघ' यांचा वार्षिक वेतन वित्तीय वर्ष 2024 मध्ये 3.97 कोटी रुपये आहे, जे वित्तीय वर्ष 2023 च्या 1.49 कोटी रुपये वेतनापेक्षा जास्त आहे. त्यांची पत्नी आणि स्टार्टअपची सह-संस्थापिका वित्तीय वर्ष 2024 मध्ये 1.79 कोटी रुपये वेतन मिळाले, जे वित्तीय वर्ष 2023 च्या 99 लाख रुपयांपेक्षा 80.8% जास्त आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये मामाअर्थाची ऑपरेशनल रेव्हेन्यू 1,919.9 कोटी रुपये आहे आणि कंपनीने 110.5 कोटी रुपये नफा कमावला.