PHOTOS

दररोज करा अनुलोम-विलोम, 'या' 6 आजारांवर करता येईल मात

Anulom Vilom Pranayama Benefits: अनुलोम-विलोम प्राणायामाच्या मदतीने औषधे न घेता अनेक आजारांपासून मुक्ती मिळवता येते. कोणकोणत्या समस्यांवर याचा फायदा होतो ते जाणून घेऊयात.

Advertisement
1/8

Anulom Vilom Benefits: तुम्ही सततच्या औषधांच्या सेवनाने त्रस्त आहात आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय आरोग्य सुधारण्याचा विचार करत असाल, तर योग हा उत्तम पर्याय आहे. विशेषतः अनुलोम-विलोम प्राणायाम केवळ शरीरात ऊर्जा वाढवत नाही, तर गंभीर आजारांपासूनही संरक्षण करते.

2/8
दमा आणि श्वसनाचे आजार
दमा आणि श्वसनाचे आजार

दमा आणि ब्राँकायटिससारख्या समस्या असताना नियमित सराव केल्यास खूपच आराम मिळतो. काहींना तर इनहेलरची गरजही कमी भासू लागते. फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे प्राणायम फारच उपयुक्त ठरते.

3/8
उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब

दररोज प्राणायाम केल्याने तणाव आणि रागावर नियंत्रण ठेवता येते. तसेच हृदयविकारांची शक्यताही कमी होते. हृदयाचे ठोके सुरळीत राहतात आणि रक्तदाब नैसर्गिकरीत्या संतुलित राहतो.

4/8
मधुमेह
मधुमेह

प्राणायाम रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवतो आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतो. यामुळे दीर्घकाळ मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

5/8
मायग्रेन आणि डोकेदुखी
मायग्रेन आणि डोकेदुखी

अनुलोम-विलोममुळे मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. ज्यामुळे मायग्रेन, तणाव आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. यामुळे डोके हलके वाटू लागते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.

6/8
ताण आणि चिंता
ताण आणि चिंता

अनुलोम-विलोम शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन कमी करतो. त्यामुळे मानसिक स्थैर्य येते आणि नैराश्याची लक्षणे देखील कमी होतात. यासोबतचं आत्मविश्वास वाढतो आणि मनही शांत राहते.

7/8
झोपेच्या समस्या
झोपेच्या समस्या

झोप न लागणे किंवा वारंवार झोपेतून जाग येणे यावरही हे प्राणायाम प्रभावी ठरते. प्राणायमामुळे रात्री शांत झोप लागते आणि सकाळी ताजेतवाने वाटते.

 

8/8

याशिवाय, अनुलोम-विलोम शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो. त्वचा निरोगी आणि तेजस्वी होते. रोज फक्त 10-15 मिनिटे प्राणायमाचे फायदे दीर्घकाळ टिकतात.





Read More