Virat Kohli Bodyguard Salary Will Shock You: विराट कोहलीच्या सुरक्षारक्षकाचा म्हणजेच बॉडीगार्डच्या पगाराचा आकडा पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. विराटच्या याच बॉडीगार्डकडे अनुष्काच्या सुरक्षेचीही जबाबदारी आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा बॉडीगार्ड आणि त्याला किती पगार दिला जातो.
विराटबरोबरच तो अनुष्काच्या संरक्षणाचीही जबाबदारी पार पाडतो. त्याचा पगार कॉर्परेटमधील कोणत्याही सीईओपेक्षाही अधिक आहे.
भारतामधील अनेक सेलिब्रिटी स्वत:च्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. विराटही याला अपवाद नाही.
भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहलीनेही त्याच्या खासगी सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात केला आहे.
विराटच्या बॉडीगार्डला सोनू नावाने ओळखलं जातं. तो अनुष्काचाही बॉडीगार्ड आहे.
मात्र विराटच्या बॉडीगार्डचं खरं नाव प्रकाश सिंह असं आहे.
विराट कोहली प्रकाश सिंहला त्याच्या कुटुंबाचा सदस्यच मानतो.
विराटच्या सुरक्षेची जबाबदारी प्रकाश सिंहच्या खांद्यावर असून तो विराट दौऱ्यावर नसताना सावलीसारखा त्याच्यासोबत असतो.
विराट आणि त्याची पत्नी अनुष्कासारख्या अती महत्त्वाच्या व्यक्तीला सुरक्षा देण्याचं काम करणाऱ्या व्यक्तीला पगारही तसा तगडाच असेल याच शंका नाही.
प्रकाश अनेकदा अनुष्काबरोबर वेगवेगळ्या सोहळ्यांना आणि सेटवर तिची सुरक्षा करताना दिसतो. विराटही प्रकाश सिंहला लाखो रुपयांची सॅलरी देतो. हा आकडा आता समोर आला आहे.
अनेक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विराट त्याच्या खासगी बॉडीगार्डला वर्षाला 1.2 कोटी रुपये देतो.
म्हणजेच विराटचं संरक्षण करणाऱ्या बॉडीगार्डला महिन्याला 10 लाख रुपये पगार आहे. एखाद्या कंपनीच्या सीईओ इतका हा पगार आहे.