बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा खान आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. जून्या नात्यात अडकून न राहता ते आपआपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. तरी देखील अरबाजचे मलायकाच्या परिवाराशी असलेले संबंधांमध्ये कोणतही दूरावा आलेला नाही.
मलायकासोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर अरबाज पुन्हा एकदा प्रेमाच्या शोधात होता आणि गर्लफ्रेंड एलेक्जेंड्रा कामेलिया भेटल्यानंतर त्याचा हा शोध थांबला.
अरबाज खान गर्लफ्रेंड एलेक्जेंड्रासोबत मुंबईतील पिंक व्हिलेज कॅफेत लंचसाठी गेला होता. यावेळेस तो एकटा नसून मलायकाची आई आणि बहिण अमृता अरोराही सोबत होत्या.
एलेक्जेंड्रा कामेलियाने पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि व्हाईट रंगाची पॅंड घातली होती. तर अरबाजने गुलाबी रंगाचा टीशर्ट घातला होता.
या भेटीत अमृता अरोरा, एलेक्जेंड्रा कामेलिया आणि अरबाज खान धमाल मस्ती करताना दिसले.
अरबाजचे मलायकासोबतचे नाते संपले असले तरी तिच्या परिवारासोबत असलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत. मयालकाच्या बर्थडेपासून ते फॅमेली आऊटिंगपर्यंत अरबाज नेहमीच अरोरा परिवारासोबत दिसतो. इतकंच नाही तर तलाक होऊनही अरबाजच्या वाढदिवसादिवशी मलायका रात्री १२ पर्यंत अरबाजसोबत सेलिब्रेशन करताना दिसली. (फोटो सौजन्य- Yogen Shah)