Archana Puran Singh Dubai Scam: बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध टीव्ही व्यक्तिमत्त्व अर्चना पूरण सिंगची दुबईमध्ये फसवणूक. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध टीव्ही व्यक्तिमत्त्व अर्चना पूरण सिंग हिने अलीकडेच एक मोठा खुलासा केला आहे. दुबईमध्ये अर्चना पूरण सिंगची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
दुबई में हमारे पैसा डुब गये’ बनावट तिकीट साइटवर पैसे गमावल्यानंतर अर्चना पूरण सिंगचा दुबई प्रवास उदास झाला.दुबईचे कडक नियम आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी प्रतिष्ठा असूनही या घटनेनंतर ती आश्चर्यचकित झाली.
तिच्या कुटुंबाने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून इनडोअर स्कायडायव्हिंगचे तिकीट बुक केले होते. मात्र, जेव्हा त्या प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचल्या तर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं. कारण ती वेबसाइट बनावट होती.
अर्चना पूरण सिंगने एका Youtube ब्लॉगमध्ये ही सर्व घटना सांगितली आहे. यावेळी त्यांचा मुलगा आर्यमन पुढे म्हणाला, मी ज्या वेबपेजवरून आमची तिकिटे खरेदी केली होती ते वेबपेज कुठेही सापडले नाही.
मी मध्यम पॅकेज चार मिनिटांसाठी राखीव केले होते. परंतु मी चेक आउट केल्यावर ते फक्त दोन मिनिटे चालले. त्यावेळी मला संशयास्पद वाटले. मी गृहीत धरले की ते एक बग आहे.
अर्चनाने स्वतः कबूल केले की वेबसाइट खरी नसल्यामुळे आमची फसवणूक झाली आहे. त्यावेळी परमीत सेठी यांनी नाराजी व्यक्त करत आनंद घ्या, ज्याने आम्हाला फसवले आहे असं म्हटलं.
सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ह्या घटना देशापुरत्या मर्यादित राहिल्या नसून त्या आता जगभरात घडू लागल्या आहेत.
त्यामुळे सुट्टीसाठी परदेशात जाताना आपण उत्साही आणि बिनधास्त असतो. पण अर्चना पूरण सिंग यांचा हा अनुभव आपणाला शिकवतो आहे की अनेक ठिकाणी सावधगिरी हेच आपलं संरक्षण आहे.