PHOTOS

Skincare for Busy Moms: वर्किंग मॉम आहात? एस्क्स्पर्ट करून जाणून झटपट करताना करता येणारं स्किनकेअर रुटीन

Skincare Solutions for Busy Moms: थोडा वेळ, थोडं लक्ष, आणि नियमित सवयी एवढ्याच गोष्टींच्या मदतीने तुम्हीही व्यस्त दिनचर्यामध्ये स्किनकेअरला जागा देऊ शकता. कारण कोणतीही आई, कितीही व्यस्त असली तरी स्वतःच्या सौंदर्याची आणि आरोग्याची काळजी घेणे तेवढेच गरजेचे असते. 

 

Advertisement
1/8

Skincare Solutions for Busy Moms: घर, काम आणि मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी वेळ काढणं अनेक मातांसाठी कठीणच होतं. अशातच स्किनकेअरला प्राधान्य देणं अनेकदा शक्य होत नाही. मात्र, चांगल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तासन्‌तास वेळ देणं आवश्यक नाही काही सोपी, पण नियमित सवयीसुद्धा तुमची त्वचा निरोगी, तजेलदार आणि संतुलित ठेवू शकतात.

 

2/8

जर तुम्ही स्किनकेअरपासून दूर गेल्या असाल, तर यंदाचा वर्ष एक चांगली सुरुवात करण्याची संधी आहे. जॉय पर्सनल केअरच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर, पौलोमी रॉय यांनी व्यस्त मातांसाठी खास अशा पाच सोप्या स्किनकेअर टिप्स शेअर केल्या आहेत, ज्या तुमच्या दैनंदिन शेड्यूलमध्ये सहज बसू शकतात.

3/8
दिवसाची सुरुवात आणि शेवट 'क्लेंजिंग'ने करा
दिवसाची सुरुवात आणि शेवट 'क्लेंजिंग'ने करा

सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याआधी सौम्य, मॉइश्चरायझिंग क्लींझरने चेहरा स्वच्छ करा. हे त्वचेवरील धूळ, घाम आणि तेल साफ करतं आणि त्वचेला फ्रेश ठेवतं. यामुळे पुढच्या स्किनकेअर स्टेप्स अधिक प्रभावी ठरतात.

4/8
आठवड्यातून दोनदा 'एक्सफोलिएशन'
आठवड्यातून दोनदा 'एक्सफोलिएशन'

त्वचेवर साचलेले मृत पेशी आणि डलनेस दूर करण्यासाठी आठवड्यातून दोनदा सौम्य स्क्रब वापरा. यामुळे त्वचा मृदू, उजळ आणि अधिक उजवी दिसते.

 

5/8
'टोनर'ने त्वचेला ताजेपणा द्या
'टोनर'ने त्वचेला ताजेपणा द्या

क्लेंजिंगनंतर एक सौम्य टोनर वापरल्याने त्वचेचा pH स्तर संतुलित राहतो, छिद्रं आकुंचित होतात आणि त्वचा ताजी वाटते. यामुळे सीरम आणि क्रीम्स चांगल्या प्रकारे त्वचेत शोषले जातात.

6/8
मॉइश्चरायझिंग विसरू नका
मॉइश्चरायझिंग विसरू नका

हायड्रेशन ही निरोगी त्वचेसाठी अत्यंत आवश्यक आहे. रोज सकाळी आणि रात्री त्वचेला पोषण देणारा मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा सॉफ्ट, कोमल आणि हवामानातील बदलांपासून सुरक्षित राहते.

7/8
'सनस्क्रीन' आवर्जून लावा
'सनस्क्रीन' आवर्जून लावा

कोणतंही हवामान असो, सूर्यप्रकाशापासून संरक्षण अत्यावश्यक आहे. दररोज सकाळी ब्रॉड-स्पेक्ट्रम SPF असलेली सनस्क्रीन लावून त्वचेला UV किरणांपासून वाचवा. यामुळे त्वचेवर सुरकुत्या, डाग आणि अॅजिंगची प्रक्रिया मंदावते.

8/8
आतूनही काळजी घ्या
आतूनही काळजी घ्या

त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी केवळ बाह्य रुटीन पुरेसं नाही. योग्य प्रमाणात पाणी प्या, फळं-भाज्यांनी समृद्ध आहार घ्या, नीट झोप घ्या आणि तणाव नियंत्रणात ठेवा. या सगळ्याचा एकत्रित परिणाम त्वचेवर सकारात्मक दिसून येतो.





Read More