PHOTOS

सारा तेंडुलकरची 1137 कोटींची डिल! शुभमन सेलिब्रेट करत असताना सचिनच्या लेकीनं...

Sara Tendulkar Rs 1140 Crore Earning: संपूर्ण जगाचं लक्ष भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलकडे लागलेलं असतानाच दुसरीकडे सारा तेंडुलकरने 1140 कोटींच्या एका मोठ्या करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार नेमका काय, साराला काय करावं लागणार जाणून घेऊयात... (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

Advertisement
1/12
सातत्याने चर्चेतील नाव
सातत्याने चर्चेतील नाव

प्रत्येकाचं नशीब आधीपासूनच लिहिलेलं असतं असं म्हणतात. त्यापेक्षा कोणाला काही कमीही मिळत नाही आणि अधिकही मिळत नाही. अनेक सेलिब्रिटी किड्स तर तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत असं सर्वसामान्यांचं मत असतं. याच यादीमधील एक नाव म्हणजे अनेकदा शुभमन गिलसोबत नाव जोडलं गेलेली माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर! (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

 

2/12
काही दिवसांपूर्वीच दोघे भेटले
काही दिवसांपूर्वीच दोघे भेटले

खरं तर सारा आणि भारतीय कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार शुभमन गिल यांच्या लिंकअपच्या बातम्या अनेकदा समोर आल्या. दोघांबद्दल बऱ्याच उलट-सुलट चर्चा झाल्या. मात्र दोघांनी कधीही याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नोंदवली नाही. काही दिवसांपूर्वीच युवराज सिंगने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सारा आणि शुभमन फोटोत दिसतंय त्याप्रमाणे एकमेकांना भेटलेले. (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

3/12
दोघांसाठीही खास ठरला दिवस
दोघांसाठीही खास ठरला दिवस

सोमवारचा दिवस मात्र सारा आणि शुभमन या दोघांसाठीही खास ठरला. एकीकडे शुभमनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं तर दुसरीकडे त्याचवेळी सारा ही अब्जाधीश झाली आहे. (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

 

4/12
शुभमनचं फोटो शूट अन्...
शुभमनचं फोटो शूट अन्...

मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर लंडनच्या मैदानावर शुभमन गिल अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसह फोटोशूट करत असताना दुसरीकडे त्याचवेळी ऑस्ट्रेलियन सरकारने सारा तेंडुलकरसोबत एक मोठा करार केला. (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

 

5/12
नेमका करार कोणाबरोबर?
नेमका करार कोणाबरोबर?

माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिला ऑस्ट्रेलियन टुरिझमने ब्रँड अँबेसिडर म्हणून साइन केले आहे. ऑस्ट्रेलियामधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी सारा तेंडुलकरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

 

6/12
1137 कोटी रुपये
1137 कोटी रुपये

साराबरोबर झालेल्या करारानुसार या कामासाठी ऑस्ट्रेलिया सरकार या मोहिमेसाठी 130 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 1137 कोटी रुपये खर्च करणार आहे. (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

 

7/12
शुभमन सेलिब्रेट करताना सारा...
शुभमन सेलिब्रेट करताना सारा...

खरं तर सारा आणि शुभमनसाठी एकच दिवस लकी ठरणं हा योगायोगच मानावा लागेल. ज्या दिवशी शुभमन गिल त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठा दिवस साजरा केला त्याचवेळी हजारो किलोमीटर अंतरावर सारा तेंडुलकरने एका मोठ्या करारावर स्वाक्षरी केली. (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

 

8/12
कोणकोणत्या देशांचा समावेश
कोणकोणत्या देशांचा समावेश

ऑस्ट्रेलियामध्ये पर्यटन वाढवण्याच्या उद्देशाने सुरू होणारी सारा तेंडुलकरचा समावेश असलेली ही मोहीम जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये असेल. भारताव्यतिरिक्त अमेरिका, युके, चीन, जपान इत्यादी मोठ्या देशांमध्ये ही मोहिम राबवली जाणार आहे. (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

 

9/12
नेमका हेतू काय?
नेमका हेतू काय?

सारा प्रमाणेच प्रत्येक देशातील एका प्रसिद्ध चेहऱ्याला या मोहिमेचा भाग बनवण्यात आले आहे. त्यामुळे त्या सेलिब्रिटीच्या देशातील लोक ऑस्ट्रेलियाला भेट देण्यासाठी येतील अशी योजना आखण्यात आली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये पर्यटन वाढेल आणि त्यातून मिळणारे उत्पन्नही वाढेल. या मोहिमेचा उद्देश या मोठ्या देशांतील लोकांना ऑस्ट्रेलियाला प्रवास करण्यास प्रोत्साहित करण्याचा आहे. (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

 

10/12
कधीपासून सुरु होतेय ही मोहिम?
कधीपासून सुरु होतेय ही मोहिम?

सारा आणि तिच्यासारख्या करारबद्ध करण्यात आलेल्या लोकांना ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत केली जाईल आणि अनेक सुविधा दिल्या जातील. 7 ऑगस्टपासून चीनमधून ही मोहिम सुरू होईल, नंतर वर्षाच्या अखेरीस पर्यंत इतर देशांमध्ये काम सुरू केले जाईल. (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

11/12
साराला का करारबद्ध करण्यात आलं?
साराला का करारबद्ध करण्यात आलं?

सारा तेंडुलकरला का करारबद्ध करण्यात आलं याबद्दल बोलताना, टुरिझम ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापकीय संचालक फिलिपा हॅरिसन यांनी, "आमच्या नवीन मोहिमेत रुबीसोबत विविध क्षेत्रातील 5 प्रसिद्ध प्रतिभाशाली व्यक्ती सहभागी होणार आहेत. हे ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेल्या कालावधीतील अनुभव लोकांसोबत शेअर करतील," असं सांगितलं. (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)

 

12/12
कोणत्या देशाकडून कोणाशी झालाय करार?
कोणत्या देशाकडून कोणाशी झालाय करार?

टुरिझम ऑस्ट्रेलियाच्या या नवीन मोहिमेत अमेरिकेत ऑस्ट्रेलियन वन्यजीव संरक्षक रॉबर्ट इरविन, युनायडेट किंग्डममधील फूड ब्लॉगर आणि टीव्हीवरील कुक निगेला लॉसन, चीनमधील अभिनेता योश यू, भारतातून सारा तेंडुलकर आणि जपानमधील विनोदी कलाकार अबारेरु-कुन यांचा समावेश आहे. (फोटो - सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)





Read More