PHOTOS

एकटे किंवा समुहाने... आषाढीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्यांसाठी एसटीची खास सुविधा आणि सवलती

ंत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपानबाबा आणि मुक्ताईंसह अनेक संतमहात्म्यांच्या पालख्या काही दिवसांनी प्रस्थान ठेवण्यास सुरुवात ...

Advertisement
1/7
पंढरपूर
पंढरपूर

Ashadhi Ekadashi 2024 : प्रवासाचा खर्चही वाचणार आणि कोणत्याही गावातून पंढरपूर गाढता येणार.... पाहा एसटी महामंडळानं कशी केलीय आखणी... माहिती वाचा, Save करा आणि इतरांनाही पाठवा 

 

2/7
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी

Ashadhi Ekadashi 2024 : यंदाच्या वर्षीच्या आषाढी एकादशीसाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिलेला असतानाच प्रशासन आणि यंत्रणाही कामाला  लागल्या असून, वारकऱ्यांसाठी आणि पंढरपुरला येणाऱ्या प्रत्येकासाठीच एसटी महामंडळानं काही खास बेत आखले आहेत. आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरच्या दिशेनं येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून 5 हजार विशेष बसगाड्या सोडण्याचं नियोजन केलं असून, प्रवाशांना या सुविधेअंतर्गत काही विशेष सेवाही पुरवल्या जाणार आहेत. 

3/7
पंढरपूर गाठणं सहज शक्य
पंढरपूर गाठणं सहज शक्य

राज्याच्या कोणत्याही गावातून आता पंढरपूर गाठणं सहज शक्य होणार आहे. कारण, तुम्ही एकट्यानं प्रवास करा किंवा समुहानं, एसटी तुमच्या सेवेत हजर असेल. आषाढीच्या निमित्तानं राज्याच्या कोणत्याही गावातील 40 किंवा त्याहून जास्त भाविक, प्रवाशांनी पंढरपुरला जाण्याची एकत्रित मागणी केल्यास या गावासाठी समर्पित अशा एसटी बसची सुविधा महामंडळाकडून करून देण्यात येईल. यासाठी प्रवाशांनी नजीकच्या एसटी आगाराशी थेट संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

4/7
खास सुविधा
खास सुविधा

थोडक्यात राज्याच्या कोणत्याही भागातून, कोणत्याही गावातून 40 किंवा त्याहून अधिक प्रवासी आणि भाविकांना पंढरपुरात जायचं झाल्यास आता हे अगदी सहज शक्य होणार आहे. 

 

5/7
वारीला होणारी गर्दी
वारीला होणारी गर्दी

पंढरपुरच्या वारीला होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून पंढरपुरात तात्पुरत्या स्वरुपात काही एसटी बस स्थानकं सुरु करण्यात येणार असून, त्याचा फायदा वारकऱ्यांना घेता येणार आहे. 

 

6/7
जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बस
जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बस
बस स्थानकाचं नाव जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बस चंद्रभागा बसस्थानक मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग, पंढरपूर आगार भिमा यात्रा देगाव छत्रपती संभाजी नगर , नागपूर व अमरावती प्रदेश विठ्ठल कारखाना नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर पांडुरंग बसस्थानक सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

 

7/7
प्रवाशांसाठी खास सवलती
प्रवाशांसाठी खास सवलती

एसटी महामंडळाकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत कायम काही सवलती देण्यात येतात. यंदाचं वर्षही यास अपवाद ठरणार नाही. महिलांसाठी एसटी महामंडळाकडून यंदा तिकिटात 50 टक्के सूट देणारी महिला सन्मान योजना लागू असेल. तर, 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधाही यादरम्यान लागू असेल. 

 





Read More