PHOTOS

ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी! देहूत वैष्णवांचा मेळावा, संत तुकोबांच्या पालखी प्रस्थानाचे मंत्रमुग्ध करणारे PHOTO

Tukaram Maharaj Palkhi Ceremony: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळयाला आजपासून सुरुवात होतीये. यावर्षीचा हा...

Advertisement
1/11
ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी! देहूत वैष्णवांचा मेळावा, संत तुकोबांच्या पालखी प्रस्थानाचे मंत्रमुग्ध करणारे PHOTO
ठाई ठाई विठ्ठल, ठाई ठाई पंढरी! देहूत वैष्णवांचा मेळावा, संत तुकोबांच्या पालखी प्रस्थानाचे मंत्रमुग्ध करणारे PHOTO

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळयाला आजपासून सुरुवात होत आहे. यावर्षीचा हा 340 वा पालखी सोहळा आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रस्थान सोहळयास सुरुवात होणार आहे. 

2/11

संत तुकाराम महाराजांची पालखी खूप सुंदररित्या सजवण्यात आली आहे.

3/11

तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची झुंबड उडाली आहे. पालखी निघताच पावसाला सुरूवात झाली आहे.

 

4/11

तुकाराम महाराजांच्या पालखीतील मानाचे 2 अश्व आणि पहिली दिंडी ही मुख्य मंदिराच्या महाद्वारातून बाहेर पडली आहे. मात्र अद्याप तुकोबांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा पार पडत आहे

5/11

आज पहाटे 4.30 वाजल्यापासून मंदीरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली. पहाटे 4.30 वाजता शिळा मंदिर येथे अभिषेक झाला. त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक व काकड़ आरती करून पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. 

6/11

स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळयाचे जनक तसेच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली.

7/11

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारा पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर पाच वाजता पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि सहा वाजता पालखी इनामदार वाड्यात मुक्कामी असणार आहे. त्यानंतर रात्री नऊ वाजता किर्तन जागर होणार आहे. 

 

8/11

तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गाव-खेड्यातून हजारो वारकरी देहू-आळंदी येथे दाखल झाले आहेत. अनेक छोट्या-मोठ्या दिंड्या या देहू नगरीकडे प्रस्थान करत असून ग्यानबा तुकाराम च्या जयघोषाने गाव खेड्यातील वातावरण भक्तीमय झालंय. 

9/11

मोठ्यांबरोबरच लहान मुलंदेखील पांडुरंगाच्या भक्तीत एकरूप झाले आहेत. ही छोटीशी चिमुरडीदेखील डोईवर तुळशीचे रोप घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झाली आहे. 

(फोटोः निलेश खरमारे)

10/11

फुगड्या घालत वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. पांडुरंगाच्या भेटीची ओढ यांच्या चेहऱ्यावरच स्पष्टपणे झळकत आहे. 

(फोटोः निलेश खरमारे)

11/11

संत तुकाराम महाराजांची पालखी तुकोबांच्या शिकवणींचा आदर करते. जे भक्ती, समता आणि नम्रता शिकवते. 

 





Read More