Anand Wari 2025 : 19 जून रोजी गुरुवारी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळा सुरु होणार आहे.
...आजी सोनियाची दिनु । वर्षे अमृताचा धनु ॥ हरी पाहिला रे हरी पाहिला रे। सबाह्यभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी ॥
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी कर कटेवरी। ठेवोनिया ।।
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणें मुक्ति चारी साधियेल्या ।।
इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशांची
रुप पाहता लोचणी । सुख झालें वो साजणी तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा। पुण्याची गणना कोण करी ।।
कोण जाणे माझे जीवींचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां लोटताती ।। अवघियांचे मन दूषित तटस्थ । लहान थोर संत वोसंडती ।।