आषाढी वारीचे वारे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वाहत आहेत. लाखो वारकरी पंढरीरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. माऊलींच्या पालख्यादेखील पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. पण तुम्हाला माहीतीये का पंढरीची वारी पहिल्यांदा कोणी केली होती. आज आपण याचे उत्तर जाणून घेऊयात.
महाराष्ट्राला संताचा व वारकऱ्यांचा वारसा लाभला आहे. आषाढी वारीची परंपरा शेकडो वर्षांपासूनची आहे. आजही वारी त्याच उत्साहात आणि भक्तीभावाने केली जाते. आज आपण विठुरायाला भेटण्यासाठी पहिल्यांदा वारी कोणी केली हे पाहुयात.
विठोबा म्हणजेच श्रीकृष्ण. रुसलेल्या देवी रुक्मिणीला आणण्यासाठी दिंडिरवनात आले. तेव्हा त्यांना त्यांच्या भक्ताची म्हणजे भक्त पुंडलिक यांची आठवण आली.
विठ्ठल दिंडीरवनात आल्यानंतर भक्त पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी गेले. तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करत होते. त्यांनी आसन म्हणून विट विठुरायाला देतो. त्यानंतर माझ्या आईवडिलांची सेवा करेपर्यंत तू विटेवर उभा रहा, असं सांगतो.
आई-वडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेले आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली, त्यांची मातृ-पितृ भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले.
पुंडलिक म्हणाले की, तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या, तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर आणि ते विटेवर उभे राहिले म्हणून विठ्ठल ओळखले जाऊ लागले
भगवान श्रीकृष्ण यांनी विठोबांचे रूप घेतल्यानंतर त्यांचे हे रूप पाहण्यासाठी भगवान शिव फारच उत्सुक होते.
एका अख्यायिकेनुसार, विठ्ठलाचे रूप इतके सुंदर होते हे की ते पाहण्याचा मोह देवांनादेखील आवरला नाही. तेव्हा साक्षांत भगवान शंकरांनी विठुरायाला भेटण्यासाठी थेट पंढरपुरी धाव घेतली. त्यामुळं पंढरीची सगळ्यात पहिली वारी ही भगवान शिव यांनी केली असं म्हटलं जातं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)