Ashadi Ekadashi 2025 Jejuri Khandoba Temple Special Decoration: खंडोबाच्या मंदिरामध्ये विशेष सजावट करण्यात आलेली आहे. या सजावटीचे खास फोटो पाहूयात...
जेजुरीमधील सजावटीचे फोटो पाहून तुमच्या डोळ्यांचं पारण फेडल्याशिवाय राहणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज जेजुरीमध्ये आगमन होणार आहेत. त्यानिमित्त कशी करण्यात आलीये सजावट पाहूयात खास फोटो...
संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी सासवडवरून जेजुरीकडे प्रस्थान ठेवेल आणि आज ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी मुक्काम हा सोन्याची नगरी जेजुरीत असणार. यासाठी जेजुरीमध्ये खास सजावट करण्यात आली आहे.
जेजुरी गडावर धुक्याची चादर पसरली आहे. हवामानात गारवा असला तरी वारकऱ्यांचा उत्साह तसाच आहे.
श्री खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
जेजुरी गडकोट आवारामध्येही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
खंडेरायाच्या गळ्यात घालण्यात आलेल्या फुलांच्या हारात संतांच्या प्रतिमा दिसत आहेत.
तुकाराम महाराज आणि नामदेव महाराजांची प्रतिमा फुलांच्या सजावटीमध्ये खंडेरायाच्या उजवीकडे दिसत आहे.
मुक्ताई आणि सोपानदेव यांच्या प्रतिमा खंडेरायच्या गाभाऱ्यातील सजावटीत दिसत आहेत.
ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्ती महाराजांच्या प्रतिमाही या सजावटीमध्ये दिसतायेत.
जनाबाई, सावता महाराजांची प्रतिमाही सजावटीसाठी वापरण्यात आल्यात.
विठूरायाच्या अंगा-खांद्यावर खेळणाऱ्या संतांचं खास शिल्प गडावर उभारण्यात आलं आहे. आज या ठिकाणी माऊलींच्या पालखीवर सोन्याची म्हणजेच भंडाऱ्याची उधळण होईल तेव्हा सारं दृष्य पाहण्यासारखं असेल यात शंका नाही.