PHOTOS

Asia Cup ची 2 जेतेपदं, 77% Win Rate अन्... धोनीच्या विक्रमांमुळे रोहितला 'विराट' कॉम्प्लेक्स

Asia Cup 2023 Dhoni Record: यंदाच्या म्हणजेच 2023 च्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. रोहित शर्मासमोर भारतीय संघाला ही मालिका जिंकवून देण्याचं आव्हान असेल. मात्र त्याचबरोबर यापूर्वी भारतीय संघ ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली आशिया चषक खेळला त्याचा कामगिरीशी तोडीस कामगिरीचं थोडं प्रेशरही रोहितवर असेल. ज्या कर्णधाराबद्दल आपण बोलतोय तो कर्णधार म्हणजे महेंद्र सिंग धोनी. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार अधिक ओळख असलेल्या धोनीचा आशिया चषकामधील रेकॉर्ड पाहून तुम्ही सुद्धा नक्कीच थक्क व्हाल यात शंका नाही.

Advertisement
1/16

आशिया चषक स्पर्धेमध्ये यंदा रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे. त्याच्यासमोर संघाला विश्वचषकाआधी ही स्पर्धा जिंकून देण्याचं आवाहन असेल.

2/16

मात्र रोहित कसं नेतृत्व करणार याबरोबरच आशिया चषकामध्ये भारतासाठी सर्वात यशस्वी राहिलेल्या धोनीच्या आकडेवारीच सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे. धोनीची कामगिरी कर्णधार म्हणून या स्पर्धेत कशी राहिली पाहूयात...

3/16

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषकामध्ये 19 सामने खेळला असून त्यापैकी केवळ 4 सामन्यांमध्ये भारत पराभूत झाला आहे.

4/16

भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली आशिया चषकामध्ये 2008 ते 2018 दरम्यान 14 सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला.

5/16

2008 मध्ये भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली हाँगकाँगला 256 धावांनी पराभूत केलेलं. याच वर्षी भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सने तर बांगलादेशला 7 विकेट्सने पराभूत केलेलं.

6/16

2008 मध्येच पाकिस्तानने भारताला 8 विकेट्सने पराभूत केलेलं. त्याचवर्षी श्रीलंकेनेही भारताला 100 धावांनी पराभूत केलं होतं. पण त्यापूर्वी भारताने श्रीलंकेला 6 विकेट्ने धूळ चारलेली.

7/16

2010 मध्ये भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना बांगलादेशला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. पाकिस्तानलाही 3 विकेट्स राखून याच पर्वात भारताने पराभूत केलेलं.

8/16

मात्र 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्धचा एक सामना भारताने धोनीच्या नेतृत्वाखालीच 7 विकेट्सने गमावलेला. याचा वचपा पुढच्या सामन्यात भारताने लंकेला 81 धावांनी नमवून काढला.

9/16

2012 मध्ये भारताने श्रीलंकेला 50 धावांनी तर पाकिस्तानला 6 विकेट्स राखून जिंकवलेलं. पण याच पर्वात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताचा बांगलादेशकडून 5 विकेट्सने पराभव झालेला.

10/16

2012 नंतर भारत धोनीच्या नेतृत्वाखाली एकही सामना हरलेला नाही. 2012 मध्ये भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केलेलं. 

11/16

त्यानंतर 2016 साली भारताने बांगलादेशला 45 धावांची पराभूत केलेलं. पाकिस्तानविरुद्धचा सामना 5 विकेट्सने धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने जिंकला होता. 

12/16

2016 च्या पर्वात धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंका, युएई आणि बांगलादेशलाही पराभूत केलं होतं. श्रीलंकेविरुद्धचा सामना 5 विकेट्सने, युएईविरुद्धचा सामना 9 तर बांगलादेशविरुद्धचा सामना 8 विकेट्सने जिंकला होता.

13/16

धोनीच्या नेतृत्वाखाली आशिया चषकामध्ये भारताचा एकमेव सामना अनिर्णित राहिला. तो म्हणजे 2018 च्या पर्वात अफगाणिस्तानविरुद्ध खेळवला गेलेले सामना.

14/16

म्हणजेच आशिया चषकामध्ये एक बरोबरीत सुटलेला सामना वगळल्यास 18 पैकी 14 विजयांसहीत कर्णधार म्हणून धोनीच्या विजयाची टक्केवारी तब्बल 77.77 टक्के इतकी आहे. 

15/16

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2010 साली आणि 2016 साली आशिया चषक स्पर्धा जिंकली. 

16/16

भारताने आतापर्यंत 7 वेळा ही स्पर्धा जिंकली असून दोन वेळा हे जेतेपद धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवलं आहे.





Read More