PHOTOS

पांढरी साडी, लाल बांगड्या अन्... चाहते क्लिन बोल्ड! क्रिकेटच्या मैदानावरील ही सौंदर्यवती कोण?

Who is Trishala Gurung: पाकिस्तानमधील मुल्तानच्या मैदानामध्ये खेळवण्यात आलेल्या आशिया चषक 2023 च्या पहिल्या सामन्यामध्ये यजमान संघाने नेपाळला 238 धावांनी पराभूत केलं. मात्र या सामन्याआधी पार पडलेल्या शानदार ओपनिंग सेरेमनीमध्ये एका तरुणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ही तरुणी कोण यावर तिची सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टाकलेली नजर...

Advertisement
1/19

आशिया चषक 2023 चं उद्घाटन पाकिस्तानमधील मुल्तानमध्ये 30 ऑगस्ट रोजी झालं. स्पर्धेतील नेपाळ आणि पाकिस्तान या पहिल्या सामन्यानंतर सोशल मीडियावर केवळ तिचीच चर्चा आहे. ही तरुणी नेमकी आहे तरी कोण जाणून घेऊयात तिच्याबद्दल...

2/19

आशिया चषकाची सुरुवात 30 ऑगस्ट 2023 पासून झाली. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळदरम्यान खेळवण्यात आला. हा सामना पाकिस्तानने जिंकला असला तरी सामन्याआधी एका तरुणीने सर्वांचीच मनं आपल्या आवाजाने जिंकली.

3/19

या तरुणीचा आवाज इतका सुंदर होता की आशिया चषक 2023 ओपनिंग सेरेमनी संपल्यानंतर या तरुणीचं नाव सोशल मीडियावर ट्रेण्ड होऊ लागलं. फार सुंदर दिसत असलेली ही तरुणी कोण आणि ती काय करते हे पाहूयात...

4/19

आशिया चषक 2023 ओपनिंग सेरेमनीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या तरुणीचं नाव आहे त्रिशला गुरुंग. त्रिशलाच्या मधुर आवाजाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले.

5/19

त्रिशलाचा परफॉरमन्स हा चर्चेचा विषय ठरला. खरं तर त्रिशला ही मल्टी टॅलेंटेड आहे.

6/19

त्रिशला ही उत्तम गायिका तर आहेच पण संगीतकारही आहे. ब्युटी विथ ब्रेन अशी त्रिशलाची ओळख आहे. 

7/19

त्रिशला आशिया चषक 2023 ओपनिंग सेरेमनीमध्ये पारंपारिक नेपाळी वेशात दिसून आली.

8/19

त्रिशलाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. हातात लाल बांगड्या होत्या. 

9/19

त्रिशला गुरुंग ही नेपाळमधील गायिका आहे. तिचे अनेक म्युझिक अल्बम रिलिज झाले आहेत. तिला संगिताचं उत्तम ज्ञान आहे. 

10/19

त्रिशला ही काठमांडूमधील अनेक मोठ्या हॉटेल, पब्ज आणि लाउंजमध्ये गाण्यांचे शो करते. 

11/19

यापूर्वीही त्रिशलाने अनेकदा खेळांच्या स्पर्धांच्या उद्घाटनांच्या कार्यक्रमांमध्ये आपली गायनाची कला सादर केली आहे.

12/19

नेपाळमधील धारण येथील राहणारी त्रिशला ही मॉडलिंगही करते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट मॉडलिंगचे अनेक फोटो, व्हिडीओ पहायला मिळतात.

13/19

आश्चर्याची बाब म्हणजे गायिका म्हणून प्रसिद्ध असली तरी त्रिशला ही पेशाने डॉक्टर आहे. तिने डॉक्टरीचं शिक्षण घेतलं आहे.

14/19

एमबीबीएसची पदवी त्रिशलाकडे आहे. तिने नेपाळ मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आहे.

15/19

त्रिशलाचं एक युट्यूब चॅनेलही आहे. या चॅनेलला लाखोंच्या संख्येनं सबस्क्रायबर्स आहेत.

16/19

त्रिशला तिच्या युट्यूब चॅनेलवर गाण्यांबरोबर वेगवेगळे व्हॉगही आपल्या या चॅनेलवरुन शेअर करते.

17/19

त्रिशला विवाहित असून तिने नेपाळमधील म्युझिक इंडस्ट्रीतील नामांकित व्यक्तीमत्व असलेल्या रोहित शाक्यशी लग्न केलं आहे.

18/19

त्रिशला आणि रोहितचं याच वर्षी म्हणजेच 2023 साली लग्न झालं. 

19/19

त्रिशलाचे आशिया चषक 2023 ओपनिंग सेरेमनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ती आता नवी क्रश असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.





Read More