Ind Vs Pak Highlights : विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं पाकिस्तानपुढं 356 धावांचा डोंगर उभा केला आणि इथंच पाकचा आत्मविश्वास कोलमडला.
106 चेंडूंमध्ये त्यानं 12 चौकार आणि 2 षटकार ठोकत भारतीय धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं. इथं त्याची फलंदाजी कडाडतानाच तिथं सोशल मीडियावर चाहत्यांनी कल्ला करण्यास सुरुवात केली.
सर्व स्तरांतून केएल आणि विराटचं कौतुक झालं. अगदी केएलचे सासरे म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टी यानंही जावयाचं तोंड भरून कौतुक केलं.
राहुलचा ऑनफिल्ड फोटो पोस्ट करत सुनील शेट्टीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'एक भव्य कामगिरी, एक अद्वितीय पुनरागमन... सर्व प्रयत्नांना बळ देणाऱ्या नियतीचे आभार आणि कृतज्ञता.'
तिथं केएलची पत्नी आणि सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टीनंही या यशासाठी पतीचं कौतुक केलं.
'रात्र कितीही गडद असली तरीही ती सरते आणि सूर्योदय होतो... तू सर्वस्व आहेस I Love You', असं तिनं लिहित तिनं केएलचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला.
केएल राहुल आणि शेट्टी कुटुंबाशी असणारं त्याचं सुरेख नातं यानिमित्तानं जमागसमोर आलं आणि चर्चा सुरु झाली या सेलिब्रिटी नातेसंबंधांची.
विराटच्या साथीनं केएल राहुलनं मैदान राखलं आणि बिनबाद 111 धावा केल्या. बऱ्याच काळानंतर केएलला खेळपट्टीवर सूर गवसला आणि या संधीचं त्यानं सोनं केलं. असं की क्रिकेटप्रेमींना कायम लक्षात राहील.