PHOTOS

Asia Cup स्पर्धेत Mumbai Indians चा संघ भारताकडून खेळणार! सोशल मीडियावर टीकेची झोड

Asia Cup 2023 Team India Almost MI Squad: 30 ऑगस्ट 2023 पासून सुरु होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज मुंबईमध्ये करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक निवडसमितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आणि त्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली. मात्र भारतीय संघ पाहून अनेकांना मुंबई इंडियन्सचाच संघ भारतीय संघाकडून आशिया चषक स्पर्धा खेळणार की काय असा प्रश्न पडला आहे. तुम्ही सुद्धा ही यादी एकदा पाहा आणि बघा तुम्हालाही मुंबई इंडियन्सचाच संघ यात दिसतोय का...

Advertisement
1/13

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघांची घोषणा आज मुंबईमध्ये झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीनंतर संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर आगरकर आणि संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. 

2/13

अजित आगरकर यांनी 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघाची घोषणा केली. या संघामध्ये एकूण 17 खेळाडू आहेत. मात्र या संघाकडे पाहिल्यास संघामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा दबदाब दिसून येत आहे. पाहूयात नेमके मुंबई इंडियन्सचे कोणते खेळाडू आहेत आशिया चषकासाठीच्या भारतीय संघात...

3/13

भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषक स्पर्धा खेळणार आहे. रोहित शर्मा हा मागील अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सचं नेतृत्व आयपीएलमध्ये करतोय. त्याच्याच नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने 5 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

4/13

भारताचा मिस्टर 360 डिग्री अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव हा सुद्धा मुंबई इंडियन्सच्या संघातूनच पुढे आलेलं टॅलेंट आहे. मागील अनेक पर्वांमध्ये सूर्यकुमारने त्याच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईला अनेक रोमहर्षक विजय मिळवून दिले आहेत.

5/13

आशिया चषक स्पर्धेमध्ये तिलक वर्मालाही संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणारा तिलक वर्मा हा रोहित शर्माच्या कॅम्पमधील खेळाडू आहे. रोहित शर्माचा आपल्या जडणघडणीमध्ये मोलाचा हातभार आहे असं तिलकने अनेकदा सांगितलं आहे. तिलक वर्माही मुंबई इंडियन्सच्या संघातीलच आहे.

6/13

भारतीय संघातील आणखीन एक नवखा खेळाडू म्हणजे ईशान किशन. आशिया चषक स्पर्धेमध्ये ईशानलाही संधी देण्यात आली आहे. ईशान किशन सुद्धा मुंबई इंडियन्सच्या संघातून भारतीय संघात आला आहे. ईशान हा त्याच्या उत्तम फटकेबाजीसाठी ओळखला जातो.

7/13

आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला हार्दिक पंड्या मागील 2 पर्वांपासून गुजरात जायंट्स संघाचं नेतृत्व करत आहे. मात्र त्यापूर्वी तो अनेक वर्ष मुंबई इंडियन्सकडूनच खेळत होता.

8/13

जसप्रीत बुमराह सुद्धा अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर या मालिकेच्या माध्यमातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा हुकुमी एक्का आहे. आता तो भारतीय संघाचं आयर्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये संघाचं नेतृत्व करत आहे.

9/13

याशिवाय भारतीय संघांमध्ये गुजरातच्या संघातील शुभमन गील तसेच मोहम्मद शमी, आरसीबीचे विराट कोहलीबरोबर मोहम्मद सिराज अन् प्रसिद्ध कृष्णा यांनाही संधी देण्यात आली आहे.

10/13

कोलकाता नाईट रायडर्सचा 2023 च्या पर्वातील कर्णधार श्रेयस अय्यर, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के. एल. राहुलही आशिया चषकाच्या संघात आहेत. तसेच चेन्नई सुपरकिंग्जचा रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांच्याबरोबर अक्सर पटेल, कुलदीप यादव यांचाही संघात समावेश आहे.

11/13

अनेक चाहत्यांनी हा जवळजवळ मुंबई इंडियन्सचाच संघ आहे असं बीसीसीआयने पोस्ट केलेल्या संघाच्या यादीच्या पोस्टखाली कमेंट करुन म्हटलं आहे.

12/13

मुंबईचे सहा खेळाडू आहेत याकडे एका चाहत्याने लक्ष वेधलं आहे.

13/13

इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या देशाकडून मुंबई इंडियन्सचा संघ आशिया चषक खेळणार असल्याची खोचक प्रतिक्रिया अन्य एका चाहत्याने दिली आहे.





Read More