Asthma Symptoms in Marathi : आज 7 मे ला जागतिक दमा दिवस (World Asthma Day 2024) किंवा जागतिक अस्थमा दिन म्हणून पाळला जातो. दमा हा श्वसनमार्ग आणि फुफ्फुसांशी संबंधित एक गंभीर आजारापैकी एक आहे. वेळीच उपचार न घेतल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे दम्याची लक्षणं वेळीच जाणून घ्या.
दम्याचे वेगवेगळे प्रकार असून त्याची कारणंही वेगळी असतात. बालपणातील दमा हा 5 वर्षांनंतरच्या मुलांमध्ये दिसतो. तर 18 वर्षांनंतर प्रौढ वयाच्या लोकांमध्ये दम्याची लक्षणं दिसतात.
दमा असलेल्या लोकांमध्ये सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक दिसून येतो म्हणजे घरघर.
त्यासोबत सतत खोकला असणं. खास करुन : रात्री किंवा बोलत असताना, हसताना किंवा व्यायाम करताना तुम्हाला खोकला येत असेल तर हे अस्थमाचे लक्षण आहे.
श्वास घेताना आणि बोलताना त्रास होणे.
सततच्या खोकला राहतो आणि त्यामुळे जाणवणारा थकवा हे देखील अस्थमाचे लक्षण आहे.
व्हायरल इन्फेक्शन, सर्दी आणि सामान्य फ्लूमुळे खोकला किंवा घरघर जास्त प्रमाणात जाणवणे.
छातीच्या भागात वेदना आणि घट्टपणा जाणवत असेल तर हे दम्याचे लक्षण असतं.
अनेक वेळा तोंडाच्या वाटे श्वास घेणे, अशक्तपणा किंवा चक्कर येणे हेदेखील अस्थमाचं लक्षण आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)