PHOTOS

Money Upay : धनवान बनायचंय? गडगंज श्रीमंतीसाठी करा 'हे' 13 उपाय

Money Tips : प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे गडगंज पैसा हवा. आपण कायम पैशांमध्ये खेळावं. यासाठी प्रत्येक जण मेहनत करतो. पण तरीदेखील पैसा काही खेचल्या जात नाही. मग अशावेळी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. 

Advertisement
1/14
13 उपाय
13 उपाय

मग वैदिक ज्योतिषशास्त्रात 13 उपाय सांगण्यात आले आहेत. चला मग जाणून घ्या.  

2/14
पूजेची सुपारी तिजोरीत ठेवा
पूजेची सुपारी तिजोरीत ठेवा

पुजेतील सुपारीला लाल धागा गुंडाळा आणि अक्षत, कुमकुम, फुलं अर्पण करा. आता ही सुपारी तिजोरीत ठेवा.

3/14
या वस्तू तिजोरीत ठेवा
 या वस्तू तिजोरीत ठेवा

शुक्रवारच्या दिवशी पिवळ्या कपड्यामध्ये पाच पैसे, कुंकू आणि चांदीची नाणं बांधून तिजोरीत ठेवा. तसंच यासोबत हळदीच्या गुठळ्या ठेवणेदेखील शुभ आहे. 

 

4/14
10 नोटांचं बंडल ठेवा
10 नोटांचं बंडल ठेवा

तिजोरीत 10-10 नोटांचे बंडल कायम ठेवा. यासोबतच काही पितळ आणि तांब्याची नाणीही ठेवा. पिवळी नाणी देखील ठेवली तरी चालतील मात्र जर्मन किंवा अॅल्युमिनियम ठेवू नका. 

5/14
पिंपळाचं पान
पिंपळाचं पान

एक पिंपळाचे पानावर लाल सिंदूर देशी तूप मिसळून ओम लिहा. आता हे पान तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. हा उपाय किमान पाच शनिवार करा. 

6/14
पिवळी कोरी
पिवळी कोरी

पुष्य नक्षत्राच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करा. लक्ष्मासोबत जुनी चांदीची नाणी आणि रूपये यांची गुराखी ठेवून कुंकू आणि हळदीने पूजा करा. पूजेनंतर पिवळी कोरी तिजोरीत ठेवा. 

7/14
दक्षिणावर्ती शंख ठेवा
दक्षिणावर्ती शंख ठेवा

दक्षिणावर्ती शंख घरातील पूजेच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवल्याने देवी धनसंपत्तीत वाढ होते. 

8/14
भोजपत्र
भोजपत्र

अखंड भोजपत्रावर पाणीमिश्रत लाल चंदनाने मोराच्या पिसाने 'श्री' लिहा. आता ते भोजपत्र तिजोरीत ठेवा. 

9/14
बहेडाचे मूळ
बहेडाचे मूळ

बहेडा हे सहज उपलब्ध होणारे फळ आहे. रवि-पुष्याच्या दिवशी त्याचं मूळ किंवा पानाची पूजा करा. त्यानंतर ते लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. 

 

10/14
शंखपुष्पीचे मूळ
शंखपुष्पीचे मूळ

पुष्य नक्षत्राच्या दिवशी शंखपुष्पीची पूजा करा. त्यानंतर चांदीच्या पेटीत त्याची स्थापना करा. आता ही पेटी तिजोरीत ठेवा. प्रत्येक पुष्य नक्षत्रात शंख फुलाचे मूळ आणि चांदीची पेटी बदला. पहिली पेटीतील मूळ वाहत्या पाण्यात अर्पण करा. 

11/14
यंत्राची स्थापना
यंत्राची स्थापना

ऐश्वर्य वृद्धी यंत्र किंवा धनदा यंत्र स्थापित करा. विधिवत पूजा करुन ते यंत्र तिजोरीत ठेवा. 

 

12/14
काळा गुंजा
काळा गुंजा

काळ्या गुंजाचे अकरा दाणे तिजोरीत ठेवा. त्याशिवाय लाल कपड्यावर लक्ष्मी गणरायचे चित्र ठेवा. 

13/14
व्यवसायात फायद्यासाठी
व्यवसायात फायद्यासाठी

मोत्याचा शंख आणि चांदीचे नाणे तिजोरीत ठेवा. याशिवाय नवीन लाल कपड्यात लाल मॉली बांधून तिजोरीत ठेवा. 

14/14
श्रीफळ
श्रीफळ

शुभ मुहूर्तावर लाल कपड्यात श्रीफळ, कामिया सिंदूर, देशी कापूर, लवंगा आणि थोडी दक्षिणा अर्पण करून तिजोरीत ठेवावी. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 





Read More