PHOTOS

Astrology: चार राशींवर कायम असते कुबेराची कृपा; 'इतकं' वय ओलांडताच भाग्योदयास सुरुवात

ज्योतिषविद्येमध्ये (astrology) मानवाच्या स्वभावापासून ते अगदी त्या व्यक्तीच्या यशापयशावरही भाष्य करण्यात आलं आहे. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक रास ही महत्त्वाची आणि तितकीच वैविध्यपूर्ण असते. काही राशींवर ठराविक देवदेवता आणि ग्रहांची कृपा असते. यातही धनदेवता कुबेराची कृपा असणाऱ्याची 4 अशा राशी आहेत ज्यामध्ये व्यक्तीच्या 30 ते 35 वर्षांच्या वयोमानामध्ये कमालीची प्रगती घडते. 

Advertisement
1/5

मकर- या राशीचे जातक त्यांच्या एककेंद्री आणि समर्पक वृत्तीनं इतरांवर प्रभाव पाडतात. वायफळ खर्च न करता योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी ते ओळखले जातात. वेळेचा सदुपयोग यांच्याकडूनच शिकावा. 

2/5

वृश्चिक - या राशीचे जातक अद्वितीय बुद्धिचातुर्य लाभलेले असतात. कोणत्याही पद्धतीत ते आपल्या मनीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. 

3/5

तुळ- या राशीच्या व्यक्ती प्रचंड मेहनती आणि प्रामाणिक असतात. बुद्धिचातुर्याच्या बळावर ही मंडळी पुढे जातात. त्यांना कधीच आर्थिक चणचण भासत नाही. किंबहुना ही मंडळी इतरांनाही मोलाची मदत करतात. 

4/5

कर्क- या राशीच्या व्यक्ती पैसा कमवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. ते मनात जो संकल्प बांधतात तो पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहतात. कुबेराच्या कृपेनं या राशीच्या व्यक्ती अर्थार्जनात कधीच मागे पडत नाहीत

5/5

वृषभ- या राशीचं जातक फार चतुर आणि प्रामाणिक आहे. या राशीवर शुक्र आणि कुबेराची कृपा असते. वयाच्या चाळीशीनंतर हे जातक प्रचंड श्रीमंत होतं जातात. 





Read More