सर्वांच्याच मनात काहींना काही इच्छा असते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटतं. त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. दिवस रात्र मेहनत करत राहतो.
भगवान शंकरांकडे कोणतीही इच्छा मागितली तर ती पूर्ण होते असं म्हणतात भगवान शंकराला सोमवार अतिशय प्रिय आहे, पण सोमवार व्यतिरिक्त आणखीही एक दिवस आहे जो भगवान शंकराला प्रिय आहे.
प्रदोष काळात रुद्राक्षाची माळ गळयात घालून “ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात” या मंत्राचा हजार वेळा जाप करावा.
प्रदोष असेल त्यादिवशी दिवसभर पूजा करून संध्याकाळी विधिवत शिव शंकराची पूजा केली तर त्याचा फरक लवकरच जाणवू लागेल.
प्रदोष हा दर महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला येतो. प्रदोषचा उपवास करणाऱ्या लोकांनी घरी किंवा शिवालयात जाऊन महादेवाची उपासना करावी.
प्रदोष काळात महादेवाची आराधना करण्याचा सर्वोत्तम काळ संध्याकाळी असतो.