मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशा फुलांची आरास केली गेली आहे.
संपूर्ण मंदिर हे सुंदर फुलांनी सजलं आहे. तिळ आणि गुळ दिसतील अशी ही सजावट केली गेली आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवीचं दर्शन घेण्यासाठी विशेषतः महिला आवर्जून आजच्या दिवशी उपस्थित राहत असतात.
यंदा वाण वसा देण्यासाठी बंदी आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन भाविकांना सुरू असणार आहे.