महाराष्ट्रातील सुंदर पर्यटनस्थळ फिरताना स्वर्ग सुखाचा अनुभव येईल.
...छत्रपती संभाजीनगरपासून सहा तासांच्या अंतरावर लोणावळा हे सुंदर पर्यटनस्थळ आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थाळांपैकी एक आहे. देश विदेशातील पर्यटकाना हा टूरीस्ट पाईंट नेहमीच आकर्षित करत असतो.
लोणावळा हे छत्रपती संभाजीनगरपासून 348 किमी अंतरावर आहे.
लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात फेमस हिल स्टेशन आहे. टायगर पॉईंट, भुशी डॅम, भाजे लेणी, एकवीरा देवी गड अशी अनेक पर्यटन स्थळ आहेत.
लोणवळ्यात टायगर पाईंट हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. टायगर पाईंटला नेहमीच धुकं आणि थंडगार वातावरण असत. पावसाळ्यात तर इतकं दाट धुकं असत की समोरचा माणूसही दिसत नाही.
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून 630 मीटर उंचीवर आहे.
लोणावळ्याला खंडाळ्याच्या घाटातून लाँग ड्राईव्हईची मजा काही वेगळीच. पावसाळ्यात तर येथे फिरताना स्वर्ग सुखाचा अनुभव येतो.
बाय रोड तसेच रेल्वेनेही येथे अगदी सहज पोहचता येते. छत्रपती संभाजीनगर ते पुणे किंवा मुंबईला जाणाऱ्या बसने येथे येता येवू शकते. तसेच रेल्वेने आल्यास पुणे रेल्वे स्थानकात उतरुन येथे येता येवू शकते.
लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर आणि गजबजलेले हिल स्टेशन आहे. सर्व ऋतुंमध्ये येथे पर्यटकांची गर्दी असते.