World Cup Squad Indian Origin Player Did Not Get Chance: भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जात आहे. यासाठी सर्व देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संघामध्ये एका भारतीय वंशाच्या खेळाडूचा उत्तम कामगिरीनंतरही डच्चू देण्यात आला आहे. कोण आहे हा खेळाडू आणि त्याची कामगिरी कशी राहिली आहे यावर नजर टाकूयात...
भारतामध्ये ऑक्टोबरपासून होत असलेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या 15 सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे.
पॅट कमिन्स या संघाचं नेतृत्व करत असून 5 सप्टेंबरआधी देण्यात आलेली ऑस्ट्रेलियन संघाची ही संभाव्य यादी आहे. हा संघ अंतिम मानला जात नसला तरी बऱ्याच अंशी या 15 जणांपैकीच 11 जण ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्डकपमध्ये खेळतील.
आश्चर्याची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या या चमूमध्ये भारतीय वंशाचा लेग स्पीनर तन्वीर संघाला स्थान देण्यात आलेलं नाही.
दक्षिण आफ्रिकेमधील आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणात तन्वीर संघाने उत्तम कामगिरी केलेली तरीही त्याला डावलण्यात आलं आहे.
तन्वीरने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 4 खेळाडूंना तंबूत धाडलं होतं. संघाबरोबरच नॅथन एलिस आणि अष्टपैलू खेळाडू अॅरॉन हार्डीलाही या संघात स्थान मिळालेलं नाही. तो फलंदाजीमध्येही बरी कामगिरी करतो.
तन्वीर संघाने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तन्वीरचे क्रिकेटमध्ये अनेक आदर्श असून त्यामध्ये विराट कोहलीचाही समावेश आहे.
तन्वीर संघाने 2 सामन्यांमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील संघाकडून खेळताना यजमान संघाला 3-0 ने धूळ चारली होती.
तन्वीर संघाने उत्तम कामगिरी करुनही त्याला वर्ल्डकपच्या स्पर्धेत अंतिम 15 मध्ये स्थान मिळालेलं नाही.
तन्वीर संघाऐवजी फिरकीपटू म्हणून ऑस्ट्रेलियाने अॅडम झाम्पा आणि एश्टन एगरला संधी दिली आहे.
ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगमध्ये सिडनी थंडर्स संघाकडून तन्वीर संघा खेळतो.
तन्वीर ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख संघाव्यतिरिक्त इतर संघांकडूनही खेळला आहे. मात्र त्याला वर्ल्डकपमध्ये संधी न मिळाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
स्थानिक स्पर्धांमध्ये तन्वीर संघाची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळेच त्याला राष्ट्रीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली.
तन्वीर संघाचे वडील जोगा संघा हे मुळचे जलंदरमधील रहीमपूरचे आहेत.
तन्वीर संघाचे वडील 1997 साली ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले. नंतर ते कायमचे सिडनीमध्ये राहू लागले.
तन्वीरचा जन्म 26 नोव्हेंबर 2001 साली ऑस्ट्रेलियामध्येच झाला आहे.
तन्वीर संघाला एक बहिणही आहे.
तन्वीरचे वडील ऑस्ट्रेलियामध्ये टॅक्सी चालक म्हणून काम करतात तर आई उपनीत या अकाऊटंट आहेत.