PHOTOS

Tesla ची भारतात एंट्री होताच आनंद महिंद्रा असं काय म्हणाले की थांबून थांबून वाचली जातेय त्यांची पोस्ट?

Anand Mahindra on Tesla India : एलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात पदार्पण करताच आनंद महिंद्रा यांची सूचक पोस्ट... म्हणाले... 

 

Advertisement
1/8
एलॉन मस्क
एलॉन मस्क

Anand Mahindra on Tesla India : एलॉन मस्क, या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मालकी असणारी टेस्ला कंपनी अखेर भारतात आली असून, या कंपनीचं पहिलं शोरुम भारतातील मुंबई येथे BKC मध्ये सुरू झालं आहे. 

2/8
ऑटो क्षेत्र
ऑटो क्षेत्र

जागतिक स्तरावरील ऑटो क्षेत्रामध्ये ही अतिशय महत्त्वाची बाब ठरली असून, जगाील तिसरी मोठी अर्थसत्ता होऊ पाहण्याच्या मार्गावर असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत आता याचा काय आणि कसा परिणाम दिसून येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

 

3/8
टेस्ला
टेस्ला

टेस्लाच्या येण्यानं अनेक कार निर्मात्या कंपन्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असतानाच आघाडीची कार निर्माती कंपनी, Mahindra & Mahindra चे सर्वेसर्वा असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनीसुद्धा आपलं स्पष्ट मत मांडलं. 

4/8
महिंद्रा
महिंद्रा

X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिंद्रा यांनी टेस्लाबाबत आपलं मत मांडलं. 'भारतात एलॉन मस्क आणि टेस्लाचं स्वागत आहे. जगातील सर्वात मोठ्या EV कंपन्यांपैकी एका कंपनीला आणखी संधी आहेत. स्पर्धेमुळं बदल केंद्रस्थानी येतात आणि पुढे कैक रस्ते आहेतच. मी भारतातील चार्जिंग स्टेशनवर टेस्लाची कार पाहण्यास उत्सुक आहे', असं त्यांनी लिहिलं. 

5/8
इलेक्ट्रीक कार
इलेक्ट्रीक कार

आनंद महिंद्रा यांच्या कंपनीकडूनही हल्लीच एसयुव्हीमध्ये नव्यानं इलेक्ट्रीक कार Be6 आणि Xev9e लाँच केल्या. या दोन्ही कार टेस्ला मॉडेल Y साठी तगडं आव्हान ठरणार असून, महिंद्रा यांची एकंदर भूमिका पाहता ते या जागतिक स्तरावरील कंपनीशी खिलाडूवृत्तीनं स्पर्धा करु इच्छितात. 

6/8
टेस्ला मॉडेल Y
टेस्ला मॉडेल Y

Xev9e ची तुलना भारतातील महिंद्रा कंपनीच्या टेस्ला मॉडेल Y सोबत थेट तुलना होईल. या कारची निर्मिती महिंद्राच्या INGLO प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. 

 

7/8
स्पर्धेत बाजी कोण मारतं ?
स्पर्धेत बाजी कोण मारतं ?

महिंद्राच्या या कारमध्ये 59kWh आणि 79kWh च्या दोन बॅटरी पॅकचे पर्याय देण्यात आले आहेत. तेव्हा आता टेस्ला आणि महिंद्रा यांच्यातील स्पर्धेत बाजी कोण मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

8/8

(सर्व छायाचित्र सोशल मीडिया)





Read More