Jawa Yezdi Motorcycles Showcase Jawa 350 Blue: नुकत्याच पार पडलेल्या महिंद्रा ब्लू फेस्टिवलमध्ये नुकतीच Jawa 350 Blue दाखवण्यात आली. या बाईकचे फिचर्स आणि तिचा लूक बाईकप्रेमींच्या मनात घर करून गेला.
Jawa Yezdi Motorcycles Showcase Jawa 350 Blue: महिंद्राकडून दरवर्षीप्रामाणं यंदाही पार पडलेल्या ब्लू फेस्टिव्हलमध्ये Jawa Yezdi Motorcycles कडून निळ्या रंगाची बाईक सर्वांसमोर आणण्यात आली आहे. ही बाईक आधीपासूनच मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे, पण आता मात्र ती एका नव्या रंगात सादर करण्यात आली आहे.
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लवकरच या नव्या रंगात बाईक विक्रीसाठी देशभरातील शोरुममध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळं तुम्हीही बाईक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हा चांगला पर्याय आहे.
देशातील मोटरसायकलच्या ट्रेंडला खऱ्या अर्थानं नव्या वळणावर नेणाऱ्या जावा बाईकचे आतापर्यंत अनेक मॉडेल पाहायला मिळाले. या बाईकच्या नव्या मॉडेलमध्ये पीरियर फिट फिनिश लेवल्स देण्यात आले आहेत. याशिवाय रायडर्स कम्फर्ट, क्लासिक स्टाइलिंग आणि दमदार परफॉर्मन्ससह बाईकला मोठा व्हीलबेस, 178 एमएम ग्राऊंड क्लिअरन्स मिळतो.
नव्या जोमाच्या बाईकर्ससाठी कंपनीनं बाईकमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बाईकमध्ये 350 क्लास लीडिंग ब्रेकिंग सिस्टीम आहे. पुढच्या बाजूल, 280 एमएम आणि मागे 240 एमएम डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
334 सीसी चं लिक्विड कूल्ड इंजिन असणारी ही बाईक 22.5 पीएसची पॉवर आणि 28.2 Nm चा टॉर्क जनरेट करते. शिवाय या बाईकला असिस्ट्स आणि स्लिप क्लचसुद्धा देण्यात आले आहेत.
सध्या ही बाईक करड्या, काळ्या आणि केशरी रंगांमध्ये उपलब्ध असून, येत्या काळात हा गडद निळा रंगही विक्रीसाठी उपलब्ध असेल. ही बाईक तुम्हाला टेस्ट राईडसाठी Jawa Yezdi Motorcycles च्या सर्व डीलरशिपकडे उपलब्ध आहे.
या बाईकची एक्स शोरुम किंमत 2.14 लाख रुपये आहे. तर, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये the 42, 42 Bobber, Perak आणि Yezdi stable मध्ये Roadster, Scrambler सह Adventure असेही पर्याय आहेत.