मुलांच्या आहारात हल्ली वेफर्स, चॉकलेट, जंक फुडचे प्रमाण वाढत आहे. मात्र, ही सवय सोडणवण्यासाठी पालकांनी आत्ताच पावलं उचलण्याची गरज आहे.
लहान मुलांना चटपटीत, चमचमीत पदार्थ खायला फार आवडतात. तसंच, टीव्हीवर येणाऱ्या रेडी टू इट, फास्ट फुड, जंक फुडच्या जाहिराती पाहून मुलांचा हट्टपण वाढतो. मग पालकही मुलांचा हा हट्ट पुरवतात. मात्र, रोज रोज जंक फुड खाल्ल्याने मुलांना त्याची सवय लागते आणि मग पालकांसाठी ती डोकेदुखी ठरु शकते. मुलांची जंकफुडची सवय सोडवण्यासाठी हे पाच उपाय ट्राय करा
अचानक मुलांचे जंक फुड बंद केल्यास त्यांची चिडचिड वाढू शकते. त्यामुळं काही दिवस घरातच पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा. मात्र, त्यात हेल्दी भाज्या जास्त टाका
मुलांना जंक फुड देण्याच्या आधी त्यांच्यासमोर अट ठेवा. जर संपूर्ण आठवडा घरचे जेवण जेवणार असतील तरच आठवड्याच्या शेवटी जंक फुड देऊ, असं मुलांना सांगा
विकेंडला घरीच जंक फुड बनवा. मात्र, ते बनवताना त्यात हिरव्या पालेभाज्या किंवा हेल्दी भाज्या वापरा
मुलांना दररोज एकच नाश्ता देण्याऐवजी कल्पकतेने वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या, फळे, दही आणि चीज घालून त्यांना आरोग्यदायी आहार द्यावा