PHOTOS

उन्हाळ्याच्या दिवसात कारमध्ये ठेऊ नका 'या' वस्तू, नाहीतर होऊ शकते मोठी दुर्घटना

Summer Car Care : मार्च सरून आता एप्रिल महिना सुरु झाला असल्याने उकाडा वाढू लागला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याप्रमाणेच कारची व्यवस्थित देखभाल करणं सुद्धा आवश्यक आहे. कारमध्ये बऱ्याचदा विविध गोष्टी ठेवल्या जातात तसेच वेळोवेळी कारमध्ये असणाऱ्या त्रुटी सुद्धा दुर्लक्षित केल्या जातात. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते.

Advertisement
1/7
परफ्यूम ठेवणं टाळा :
परफ्यूम ठेवणं टाळा :

कारमध्ये चांगला सुगंध यावा प्रवास करताना फ्रेश वाटावं म्हणून अनेकजण कारमध्ये परफ्यूम ठेवतात. मात्र उन्हाळ्यात कारमध्ये परफ्यूम ठेवणं धोकादायक ठरू शकतं. बहुतांश परफ्युममध्ये अल्कोहोल असल्याने उष्णतेमुळे ते विस्तारतं. अल्कोहोल हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. 50 अंशांपेक्षा कमी तापमानात परफ्युम ठेवणं सुरक्षित आहे परंतु जर तापमानाचा पारा त्याहून जास्त असेल आणि परफ्यूममधील अल्कोहोल बाटलीतून बाहेर पडलं तर कारला आग लागू शकते.

 

2/7
सॅनिटायझर ठेवणं टाळा :
सॅनिटायझर ठेवणं टाळा :

परफ्यूम सोबतच अनेकजण कारमध्ये सॅनिटायझर सुद्धा ठेवतात. अनेक सॅनिटायझरमध्ये सुद्धा अल्कोहोलचं प्रमाण असतं. अशावेळी सॅनिटायझर कारमध्ये ठेवलं असेल तर जास्त उष्णतेमुळे कारला आग लागू शकते. तेव्हा कारमध्ये सॅनिटायझर ठेवणं टाळावं. 

3/7
जुने टायर बदला :
जुने टायर बदला :

 तुमच्या कारचे टायर हे जर जुने असतील तर उन्हाळ्यापूर्वी ते बदलून घ्या. जुने टायर हवेचा दाब सहन करण्यास सक्षम नसतात आणि उन्हाळ्यात जास्त दाबामुळे टायर फुटण्याच्या घटना घडतात. जुन्या टायरवर क्रॅक पडलेले असतील तर ते टायर बदलून घ्या. 

4/7
रिकाम्या बाटल्या वापरू नयेत :
रिकाम्या बाटल्या वापरू नयेत :

प्लास्टिकची रिकामी बाटली कारच्या आत जास्त वेळ ठेवली तर तिचा वापर टाळा. उष्णतेमुळे कारमध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतून रसायनं बाहेर पडू लागतात. ही रसायनं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. तसेच प्लास्टिक बॉटल सूर्य किरणांच्या संपर्कात आल्यास ते पेट घेऊ शकतं, कारला आग लागू शकते.

5/7
खिडक्या थोड्या उघड्या ठेवा :
खिडक्या थोड्या उघड्या ठेवा :

उन्हाळ्यात उष्णतेमुळे कारच्या आत असलेल्या गरम हवेमुळे उच्च दाब तयार होऊ लागतो. अशा परिस्थितीत जर तुमची कार उन्हात उभी असेल आणि तिच्या काचा पूर्णपणे लावल्या असतील तर काचेला तडे जाण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी खिडकीच्या काचा थोड्या उघड्या ठेवाव्यात जेणेकरून आत निर्माण होणारी गरम हवा बाहेर पडू शकेल आणि काचांना तडा पडणार नाहीत. 

 

6/7
कूलंट :
कूलंट :

उन्हाळ्यात कारचं इंजिन योग्यरीत्या कार्य करण्यासाठी कूलंटची पातळी राखणं आवश्यक असतं. कूलंट कमी प्रमाणात असेल तर इंजिनवर परिणाम होऊ शकतो आणि इंजिन जास्त गरम होऊन सीझ होऊ शकतं.

7/7

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)





Read More