Ayodhya Ram Mandir : अयोध्या नगरी आपल्या लाडक्या रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या बालस्वरुप मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोमवारी 22 जानेवारीला होणार आहे. देश विदेशातून लोक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहे.
या अद्भूत सोहळ्याचं थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे. प्रत्येकाला अयोध्येत जाणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही पण घरात रामलल्लाची पूजा करणार असाल तर धार्मिक नियम जाणून घ्या.
जर तुम्ही घरात रामलल्लाचा अभिषेक करणार असाल तर काही गोष्टी चुकूनही करु नका. अन्यथा तुमची पूजा ही व्यर्थ ठरेल असं शास्त्र पंडितांनी सांगितलं आहे
घरात रामलल्ला अभिषेक करणार आहात तर घरातील मंदिर योग्य दिशेने असणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील पूजेचे स्थान ईशान्य दिशेला असं गरजेच आहे. याशिवाय मंदिराची स्थापना कोणत्याही दिशेला केल्यास पूजेचा लाभ तुम्हाला होणार नाही.
22 जानेवारीला घरात मांसाहार, अल्कोहोल किंवा इतर कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन करण्यास वर्ज्य आहे. असे केल्याने घरात नकारात्मक उर्जेचा वावर वाढतो.
घरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी घरातील स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: पूजेच्या ठिकाणी जुने हार, फुलं किंवा निरुपयोगी वस्तू नकोत. तसंच मंदिरातील सर्व देवी-देवतांच्या चित्रांची स्वच्छता करावी. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.
ज्योतिषानुसार देवघरात अंधार ठेवू नये. ही गोष्ट अत्यंत अशुभ मानली जाते. असे करणाऱ्यांना श्रीरामाचा आशीर्वाद मिळत नाही, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
प्रभू रामाच्या अभिषेकाच्या दिवशी सर्वप्रथम स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करावेत. पाट किंवा चौरंगावर लाल कपडा घाला. विधीनुसार पूजा करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरी पंडितांना बोलवू शकता. पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी घेऊन पूजेचा संकल्प करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)