Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha What Was There in PM Modi Hand: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येच्या मंदिरामध्ये ठीक 12 वाजून 05 मिनिटांनी अयोध्येतील राम मंदिरामध्ये प्रवेश केला. यावेळेस मोदींच्या हातातील 2 गोष्टींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या गोष्टी नेमक्या काय होत्या जाणून घेऊयात...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी अयोध्येतील राम मंदिर परिसरामध्ये प्रवेश केला.
कपाळी टीळा, उजव्या हातात पवित्र धागा अन् भारतीय पारंपारिक वेशभूषेमध्ये पंतप्रधान मोदी सावकाश चालत मंदिरात आले.
पंतप्रधान मोदी चालत येत असताना त्यांच्या हातातील 2 गोष्टींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
पंतप्रधानांच्या हस्तेच रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा अयोध्येतील राम मंदिरात होणार असल्याने त्यांच्या आगमनाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.
पंतप्रधान सावकाश चालत मंदिराच्या मुख्य सभामंडपातून आत आले तेव्हा त्यांच्या हाती असलेल्या गोष्टींबद्दल स्पष्टता आली.
पंतप्रधान मोदी आपल्या हातात घेऊन आलेल्या दोन्ही वस्तू रामलल्लासाठीच आहेत.
यापैकी मोदींच्या हातात दिसणारी गोष्टी ही लाल रंगाची शाल असून ती रामलल्लावर पांघरण्यासाठी आहे.
तर या लाल वस्त्राच्यावर ठेवण्यात आलेलं चांदीचं घुमट हे देवावरील छत्र असल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजा करण्यात आली.
यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेलही उपस्थित होत्या.
मोदींनी आधी जुन्या मूर्तीची पूजा केली.
मोदी गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यापासून पूर्णवेळ हात जोडून बसले होते.
मोदींच्या हतात असलेल्या वस्तूंचा हा झूम फोटो पाहा