PHOTOS

नऊ महिन्यात चार राजकीय नेत्यांची हत्या; महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. 

Advertisement
1/9
नऊ महिन्यात चार राजकीय नेत्यांची हत्या; महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?
नऊ महिन्यात चार राजकीय नेत्यांची हत्या; महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या नऊ महिन्यात चार राजकीय नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. 

2/9
7 फेब्रुवारी 2024
7 फेब्रुवारी 2024

 चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला

3/9

 महेंद्र मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 

4/9
9 फेब्रुवारी 2024
9 फेब्रुवारी 2024

 फेसबुक लाईव्ह करत शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली.

5/9

मॉरिस नोरोन्हा उर्फ ​​'मॉरिस भाई' याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली नंतर आत्महत्या केली.

6/9
4 ऑक्टोबर 2024
 4 ऑक्टोबर 2024

 भायखळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मा यांची हत्या करण्यात आली होती.

7/9

सचिन कुर्मा यांच्यावर भायखळामधील म्हाडा कॉलनीत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.

8/9

वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळीबार करुन हत्या करण्यात आली. वाय दर्जाचे संरक्षण असूनही बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली.

9/9

बाबा सिद्दीकी यांना पंधरा दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. यानंतर निर्मलनगर खेरवाडीत त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन संशयितांना  ताब्यात घेतले. या दोघांपैकी एक हरियाणाचा आणि दुसरा उत्तर प्रदेशचा आहे.





Read More