Baba Siddique Murder A to Z Story: बाबा सिद्दीकी, झिशांत सिद्दीकी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संध्याकाळी 7.30 वाजेपासून झिशांत सिद्दीकींच्या कार्यालयात होते.
Baba Siddique Murder A to Z Story: बाबा सिद्दीकी, झिशांत सिद्दीकी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संध्याकाळी 7.30 वाजेपासून झिशांत सिद्दीकींच्या कार्यालयात होते. कार्यकर्त्यांसोबत गप्पा सुरु होत्या.येणाऱ्या निवडणूकीचं प्लानींगही सुरु होतं.
साधारण 8.45 च्या सुमारास झिशांत सिद्दीकी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत कार्यालयाबाहेर पडले आणि खेरवाडीच्या दीशेनं गेले.
झिशांत सिद्दीकींपाठोपाठ बाबा सिद्दीकीही कार्यालयातून घरी जाण्यास निघाले. त्यांची कार कार्यालयापासून काही मीटर अंतरावर पार्क केली होती.
झिशांत सिद्दीकी जाताच अवघ्या 3 ते 4 मिनिटांत बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला.
सुरुवातीला लोकांमधून `चोर चोर´ असा आवाज आला. बंदोबस्ताचे स्थानिक पोलिसआवाजाच्या दीशेनं धावले
काही लोक चोर चोर म्हणत आरोपींचा पाठलाग करत असतांना गोळीबारानंतर एका आरोपीला तात्काळ रंगेहाथच पकडण्यात आलं. या पहिल्या आरोपीकडे 1 पिस्टल आणि 12 राऊंड सापडले.
दुसरा आरोपी जवळच असलेल्या एका गार्डनमध्ये शिरला. या आरोपीनं पिस्तुल जवळच फेकुन दिले.गार्डनमध्ये लपलेल्या या आरोपीलाही पोलिसांनी रात्री 9.50 पर्यंत पकडले.
या दुसऱ्या आरोपीकडेही पिस्तुल होते आणि त्याच्या बॅगेत 4 राऊंड सापडले.
तिसरा आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पळून गेला. बाबा सिद्दीकींसोबतच्या एका कार्यकर्त्याच्या पायालाही गोळी लागली