PHOTOS

Baba vanga : बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने भरली धडकी, 2022 मध्ये अनेक भाकिते ठरली खरी? जाणून घ्या कसं असणार 2023 वर्ष

ाबा वेंगा यांचे 2022 वर्षासाठीचे दोन भाकीत (Baba Vanga 2022 Predictions) खरे ठरले आहेत. आता 2022 वर्ष संपायला अवघे 22 दिवस उर...

Advertisement
1/5

बाबा वेंगा हे बल्गेरियातील एक गूढवादी होते ज्यांना बाल्कन प्रदेशातील नॉस्ट्राडेमस म्हटले जाते. त्यांनी मृत्यूपूर्वी सन 5079 पर्यंत भविष्य वर्तवले होते. वयाच्या 12व्या वर्षी बाबा वंगा यांची दृष्टी गेली होती. 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांचे निधन झाले. त्याने जगाच्या अंतापासून युद्ध आणि आपत्तीपर्यंतचे भाकीत केले. 

2/5

बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी एकूण सहा अंदाज वर्तवले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत बाबा वेंगाचे बाकीचे भाकीतही खरे ठरू शकतात, अशी भीती लोकांच्या मनात आहे. बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये नवीन प्राणघातक विषाणू दिसण्यापासून ते एलियन्सच्या हल्ल्यापर्यंतची भविष्यवाणी केली होती.

3/5

बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, 2022 मध्ये जगातील तापमानात घट होईल. त्यामुळे ट्टिटेंचा प्रादुर्भाव वाढेल. अन्नाच्या शोधात ट्टिटे भारतावर हल्ला करतील. परिणामी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. भारतात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि देशात उपासमारीची शक्यता आहे.

4/5
कोणते अंदाज खरे ठरले ते जाणून घ्या
कोणते अंदाज खरे ठरले ते जाणून घ्या

बाबा वेंगा म्हणाले होते की, 2022 मध्ये काही देशांमध्ये पाण्याची कमतरता भासणार आहे. पोर्तुगाल आणि इटलीसारख्या देशांनी लोकांना कमी पाणी वापरण्यास सांगितले आहे. या देशांमध्ये 1950 पासून सर्वात कमी पाऊस पडत आहे. इटलीमध्ये 1950 नंतरच्या सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

5/5

बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये जी भविष्यवाणी केली आहे. त्यामध्ये 2023 मध्ये एक विनाशकारी सौर वादळ येणार आहे, ज्यामुळे मोठा विनाश होऊ शकतो. 2023 साली पृथ्वी व अन्य ग्रहांच्या हालचाली या वारंवार व वेगाने झाल्याने मानवी आयुष्यात मोठे बदल दिसून येऊ शकतात. पृथ्वीची कक्षा बदलून नैसर्गिक आपत्तीची शक्यता बाबा वेंगा यांनी व्यक्त केली आहे. तसेच पृथ्वीवर एलियन्सच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, असे त्यांचे मत आहे.





Read More