Babar Azam On Resign From Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं पॅकअप (T20 World Cup 2024) झालंय. पाकिस्तानने आयर्लंडचा 3 विकेट्सने पराभव केला अन् शेवट गोड केला.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या संपूर्ण टीमची कामगिरी खराब राहिलीये. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील खेळाडूंवर नाराज आहे.
पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर होताच, बाबर आझमकडून कॅप्टन्सी काढून घ्यावी आणि काही खेळाडूंना नारळ द्यावा, अशी मागणी होताना दिसत आहे.
अशातच आयर्लंड सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कॅप्टन बाबर आझम याने कॅप्टन्सी सोडण्याबाबत मोठं वक्तव्य केलं. नेमकं काय म्हणाला बाबर?
जेव्हा मी याआधी कॅप्टन्सी सोडली होती, तेव्हा मी मला वाटलं की मला आता पुन्हा कर्णधारपद स्विकारू नये. त्यामुळे मी स्वत: त्याची घोषणा केली होती, असं बाबर म्हणतो.
मला पीसीबीने पुन्हा बोलवलं होतं, हा त्यांचा निर्णय होता. आता आम्ही पुन्हा गेल्यावर यावर नक्की चर्चा करू, असं बाबर आझमने म्हटलं आहे.
जर मी कॅप्टन्सी सोडली तर मी तुम्हाला सर्वांना कळवेल. याबाबत मी अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही आणि विचार केला नाही, असंही बाबर आझम म्हणाला.
त्यावेळी आता पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा पीसीबीकडे असेल, असं म्हणत बाबरने पीसीबीच्या हातात निर्णय सोपवला आहे.