ष्का शेट्टीनं साकारलेली 'देवसेना' सर्वांच्याच पसंतीस पडली. पण, हिच अनुष्का आता ओळखूही येत नाहीये. (Bahubali fame devsena aka Anushka sh...
एकाएकी अनुष्काच्या नावाच्या अशा चर्चा होण्याचं कारण म्हणजे, तिचे व्हायरल होणारे फोटो.
महाशिवरात्रोत्सवाच्या निमित्तानं ती कुटुंबीयांसह एका कार्यक्रमासाठी पोहोचली होती. तिथं प्रथमदर्शनी अनेकांनीच तिला ओळखलं नाही.
पांढऱ्या ड्रेसमध्ये अनुष्कानं यावेळी नो मेकअप लूकला पसंती दिली होती. पण, इथं तिच्या लूकपेक्षा जास्त चर्चा वाढलेल्या वजनाचीच झाली.
वाढलेल्या वजनामुळं ती बॉडी शेमिंगचा शिकार झाली. बापरे... हिचं वजन इतकं कसं वाढलं? असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली.
आता ही कसली चित्रपटांमध्ये झळकतेय... असंही म्हणत काहींनी तिला निशाण्यावर घेतलं.
सध्याचे फोटो व्हायरल होत असतानाच मग अनेकांनीच अनुष्का 'बाहुबली'च्या वेळी कशी दिसायची आणि आता कशी दिसतेय याबाबतही चर्चा सुरु केल्या. थोडक्यात आणखी एका अभिनेत्रीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला.