PHOTOS

Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक धावणार भारतीय रस्त्यांवर! फिचर्स, लॉन्च तारीख सर्वकाही जाणून घ्या

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने यात बाजी मारली आहे. बजाज ऑटो लवकरच सीएनजी बाईक भारतीय रस्त्यावर उतरवणार आहे.

Advertisement
1/10
जगातील पहिली CNG बाईक धावणार भारतीय रस्त्यांवर! फिचर्स, लॉन्च तारीख सर्वकाही जाणून घ्या
जगातील पहिली CNG बाईक धावणार भारतीय रस्त्यांवर! फिचर्स, लॉन्च तारीख सर्वकाही जाणून घ्या

सध्या आपण रस्त्यावर पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक्स पाहतोय. काही वर्षात बॅटरीवर चालणाऱ्या बाईक रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. पण सीएनजीवर चालणाऱ्या बाईक्स तुमच्या निदर्शनास आल्या नसतील. अनेक कंपन्या या स्पर्धेत होत्या. पण देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने यात बाजी मारली आहे. बजाज ऑटो लवकरच सीएनजी बाईक भारतीय रस्त्यावर उतरवणार आहे. 

2/10
बाईकप्रेमींचे कान टवकारले
बाईकप्रेमींचे कान टवकारले

बजाजकडून सीएनजी बाईक आणणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर बाईकप्रेमींचे कान टवकारले आहेत. आता ही बाईक कधी येणार? यात काय फिचर्स असणार? असे अनेक प्रश्न बाईक्स प्रेमींना पडले आहेत. 

3/10
अधिकृत माहिती
अधिकृत माहिती

जगातील पहिली CNG बाईक बजाज ऑटोतर्फे जुलै महिन्यात लॉन्च केली जाणार आहे. कंपनीने अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. कंपनीने बाईक संदर्भात एक आमंत्रण पाठवले आहे, ज्यामध्ये तिच्या लॉन्चची तारीख नमूद केली आहे. 

4/10
5 जुलै रोजी लाँच
 5 जुलै रोजी लाँच

आमंत्रण पत्रिकेनुसार पहिली CNG बाईक 5 जुलै रोजी लाँच केली जाणार आहे. या लॉन्चिंगवेळी बजाजचे एमडी राजीव बजाज यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही उपस्थित राहणार आहेत.

 

5/10
डिझाइन
 डिझाइन

बजाज कंपनी आपली पहिली CNG बाइक अधिक किफायतशीर आणि चांगल्या पद्धतीने डिझाइन करत असल्याची माहिती बजाजचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांच्या वतीने देण्यात आली. 

6/10
लाँच होण्याआधी टेस्टिंग
लाँच होण्याआधी टेस्टिंग

बजाजची सीएनजी बाईक लाँच होण्याआधी तिची टेस्टिंग करण्यात आली. बाईक ग्राहकांच्या हातात देण्यापुर्वी सर्व प्रकारच्या परिस्थितीत तिची चाचणी घेतली जाणार आहे. या कालावधीत काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात.

7/10
बाईकचे फिचर्स
बाईकचे फिचर्स

बजाजच्या सीएनजी बाइकमध्ये वर्तुळाकार एलईडी हेडलाइट, लहान साइड व्ह्यू मिरर, झाकलेली सीएनजी टँक, लांब सिंगल सीट, हँड गार्ड, अलॉय व्हील, फ्रंट डिस्क ब्रेक आणि डिजिटल स्पीडोमीटर यांसारखे फिचर्स असू शकतील. बाइकचे एकापेक्षा जास्त व्हेरियंट आणले जाऊ शकतात. 

8/10
मायलेज 100 किमी
 मायलेज 100 किमी

कंपनी आपल्या एंट्री लेव्हल बाईकमध्ये CNG टेक्नोलॉजी आणू शकते. त्यामुळे त्याचे मायलेज 100 किलोमीटर प्रति किलोपर्यंत असू शकते. पण योग्य माहिती लॉन्चच्या वेळीच उपलब्ध होईल.

9/10
सीएनची बाईकचा तपशील
सीएनची बाईकचा तपशील

सीएनजी बाईकच्या डिझाईनची माहिती लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहे. लीक झालेल्या ब्लूप्रिंटमध्ये बाइकची चेसिस, सीएनजी आणि पेट्रोल टाकीची माहिती समोर आली आहे. 

10/10
डबल क्रॅडल फ्रेम
डबल क्रॅडल फ्रेम

सिलेंडरसाठी बाईकला ब्रेसेससह डबल क्रॅडल फ्रेम असू शकते. बाईकमध्ये सीएनजी सिलिंडर सीटच्या खाली ठेवता येतो. तर सीएनजी भरण्यासाठी पुढील बाजूस नोजल देता येते. यासोबतच एक छोटी पेट्रोल टाकीही यात मिळणार आहे.





Read More