डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात पाच दिवस सुट्ट्या आहेत. मात्र या सुट्टा सर्व राज्यांत समान नाहीत. काही राज्यांत यापैकी काही दिवस कामकाज होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करुन या सुट्ट्यांची घोषणा केली आहे.
24 डिसेंबर मंगळवार या दिवशी नागालँड राज्यातील कोहिमा आणि ऐझॉल या ठिकाणी बँका बंद राहणार आहेत.
25 डिसेंबर बुधवारी सर्व राज्यात सुट्टी असणार आहे.
26 डिसेंबर गुरुवारी काही राज्यात सुट्टी असेल
27 डिसेंबर रोजी काही राज्यांत सुट्टी असणार आहे.
28 डिसेंबर रोजी चौथा शनिवार असल्यामुळं बँक बंद असणार आहे.
29 डिसेंबर रोजी रविवार असल्याने बँक सुट्टी असेल
30 डिसेंबर रोजी शिलाँग येथे बँका बंद असणार आहेत.
31 डिसेंबर रोजी मंगळवारी काही राज्यांमध्ये बँका बंद असणार आहे.