PHOTOS

Bank News : बँक कर्मचाऱ्यांची महिनाभर आधीच दिवाळी; पाहा असं झालंय तरी काय

Bank News : तुमच्या ओळखीत कोणी बँकेत नोकरी करतं का? तुम्हीच बँकेल नोकरीला आहात? ही बातमी तुमच्यासाठी... 

Advertisement
1/7
बँकांची कामं
 बँकांची कामं

Bank News : महिन्याची सुरुवात असो किंवा मग महिन्याचा शेवट, अनेकजण बँकांची वाट हमखास धरतात. हल्ली बऱ्याच बँकांची कामं ऑनलाईन पद्धतीनं होत असली तरीही काही कामं मात्र प्रत्यक्ष बँकांमध्येच जाऊन करावी लागतात. 

 

2/7
एक बाब लक्षात घ्या...
एक बाब लक्षात घ्या...

तुम्हीही ऑक्टोबर महिन्यात अशाच एखाद्या कामासाठी बँकेमध्ये फेरी मारण्याच्या विचारात असाल तर एक बाब लक्षात घ्या की, या महिन्यात तब्बल 16 दिवस बँक बंद राहील.

3/7
सुरुवातीचे दोन दिवस
सुरुवातीचे दोन दिवस

सुट्ट्यांपैकी सुरुवातीचे दोन दिवस कमी झाले असले तरीही आता 14 दिवस बँक कर्मचाऱ्यांची सुट्टी राहील. 

 

4/7
बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी
बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी

बँकांना असणारी ही सुट्टी पाहता, रजेच्या हिशोबानं महिनाभर आधीच बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी असणार आहे. कारण, जिथं इतर नोकरदार वर्गाला सुट्टीसाठी झिगझिग करावी लागते तिथं बँकांना मात्र सुट्ट्यांची भेटच मिळताना दिसत आहे. 

 

5/7
बँकांच्या सुट्ट्यांचं विभाजन
बँकांच्या सुट्ट्यांचं विभाजन

बँकांच्या सुट्ट्यांचं विभाजन पुढीलप्रमाणं, 14 ऑक्टोबर- महालया (कोलकाता), 18 ऑक्टोबर- कुटी बिहू (आसाम), 21 ऑक्टोबर- दुर्गा पूजा (त्रिपुरा, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल), 23 ऑक्टोबर - दसरा / महानवमी (कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, केरळ, बिहार)

 

6/7
विजयादशमी
विजयादशमी

24 ऑक्टोबर- विजयादशमी (आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता इतर सर्व राज्यात), 25 ऑक्टोबर- दुर्गा पूजा (सिक्कम), 26 ऑक्टोबर- दुर्गा पूजा/ विलय दिवस (जम्मू काश्मीर)

 

7/7
सुट्ट्या आणि बरंच काही...
सुट्ट्या आणि बरंच काही...

27 ऑक्टोबर - दुर्गा पूजा (सिक्कीम), 28 ऑक्टोबर - लक्ष्मी पूजा (प. बंगाल), 31 ऑक्टोबर - सरदार वल्लभभाई पटेल जयंती (गुजरात)

 





Read More