Bank Holidays In July 2025: दर महिन्याच्या सुरुवातीला देशातील बँकांची बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँका कोणत्या दिवशी बंद असतील याची यादी जाहीर करते. जुलैची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. जुलैमध्ये कधी आणि कशासाठी बँका बंद असतील पाहूयात...
जुलै 2025 मध्ये विविध सण-उत्सव व साप्ताहिक सुट्टया यामुळे 31 दिवसांच्या महिन्यातील एकूण 13 दिवस बँकांना सुट्टया राहणार आहे.
13 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये 4 रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार अशा सहा सुट्ट्यांचा समावेश आहे.
मात्र या 13 सुट्ट्या सर्वच राज्यांमध्ये सरसकट लागू नसून अनेक सुट्ट्या प्रादेशिक आहेत. म्हणजेच या 13 सुट्यांमध्येही राज्यनिहाय सुट्यांची संख्या कमी जास्त होणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या यादीनुसार जुलैमधील बँकांच्या सुट्या कशा आहेत? कोणत्या राज्यात कधी बँका बंद असतील? देशभरात कोणत्या दिवशी बँका बंद असतील ते पाहूयात...
3 जुलै रोजी त्रिपुरामधील बँका बंद असतील. या दिवशी खर्ची पूजा असल्याने बँकांना सुट्टी आहे. तर 5 जुलै रोजी गुरु हरगोविंदसिंहजी जन्मोत्सवानिमित्त जम्मू-काश्मीरमधील बँका बंद असतील.
6 जुलै रोजी रविवारी तसेच 12 जुलै रोजी दुसरा शनिवार असल्याने देशभरातली सर्व बँका बंद असतील. तसेच 13 जुलै रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील.
14 जुलै रोजी मेघालयमध्ये बेह दीन्खलामनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे. तर 16 जुलै रोजी उत्तराखंडमध्ये हरेला सण असल्याने बँका बंद राहणार असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
17 जुलै रोजी मेघालयमध्ये यू तिरोतसिंह पुण्यतिथी असल्याने तर 19 जुलै रोजी केरपूजेनिमित्त त्रिपुरामधील बँकांचं कामकाज बंद राहणार आहे.
20 जुलै रोजी रविवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील. त्याचप्रमाणे 26 जुलै रोजी चौथा शनिवार आणि 27 जुलै रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद असतील.
28 जुलै रोजी द्रुक्पा त्से-जी निमित्त सिक्कीममधील बँका बंद राहणार आहेत. जुलै महिन्यात सर्वाधिक प्रादेशिक सुट्ट्या ईशान्य भारतातील राज्यांना मिळणार असं स्पष्ट होत आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यात 6 सुट्ट्या असणार आहेत. म्हणजेच 31 पैकी 25 दिवस राज्यातील बँका कार्यरत असतील. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. सौजन्य- पीटीआय)